{"product_id":"niramay-jivanache-pathadarshak-by-dr-h-v-sardesai-निरामय-जीवनाचे-पथदर्शक","title":"Niramay Jivanache Pathadarshak  by Dr. H.V. Sardesai निरामय जीवनाचे पथदर्शक","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉक्टरांचं बालपण आणि त्यांचा शाळा-महाविद्यालयीन काळ यातल्या हृद्य आठवणी वाचता येतील मुकुंद भावे आणि डॉ. शरद बापट या त्यांच्या स्नेह्यांच्या लेखांमधून.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयातले अनेक लेख सराईत लेखकांचे नाहीत. काहींनी तर अशा प्रकारचं लेखन आयुष्यात पहिल्यांदाच केलं असेल. पण जवळपास प्रत्येकानं आपापल्या परीनं डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वामधल्या भिन्न धाग्याचा मनःपूर्वक शोध घेतलेला दिसेल आणि त्या सगळ्यांचा डॉक्टरांशी असलेल्या विविध नात्यांमुळे आणि आंतरिक जिव्हाळ्यामुळे हा बहुरंगी शोध वाचकांसाठी वेधक ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉक्टरांचे चिरंजीव डॉ. सुहृद यांचा लेख आपल्या प्रज्ञावान वडिलांच्या निराळ्या प्रकृतीचा शोध घेणारा आहे; तर कन्या अमला हिचा लेख वडिलांशी असलेल्या जिव्हाळ नात्याचं चित्र काढणारा आहे. त्यांच्या काही आप्तांनीही आपल्या या असामान्य नातलगाविषयी जिव्हाळ्यानं लिहिलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसातत्यानं कित्येक वर्षं आरोग्यजागरासाठी लिहिता लिहिता स्वतःबद्दल लिहिणं जणू विसरून गेलेल्या डॉक्टरांची एक मनमोकळी, दीर्घ मुलाखत या ग्रंथात हेतूःपूर्वक आरंभीच समाविष्ट केली आहे. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला ती निश्चित उपयोगी ठरेल. ती मुलाखत आणि ग्रंथाच्या पुढील भागातील लेखांमधून जे म्हटलं गेलं आहे, त्यातून हा ‘निरामय जीवनाचा पथदर्शक’ वाचकांना सुस्पष्ट दिसेल, असं वाटतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉक्टरांच्या पत्नी डॉ. कुंदाताईंचीही मुलाखत त्यांचं शांत, मृदु, मितभाषी, समर्पित व्यक्तिमत्त्व काहीसं उलगडावं, म्हणून घेतली आहे. त्यांचं मोजकं बोलणं इथे खूप ‘बोलकं’ वाटेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मन करा रे प्रसन्न!’ हा डॉक्टरांचा लेख ग्रंथाच्या अखेरीला जाणीवपूर्वक दिला आहे. या ग्रंथात डॉक्टरांचं वैद्यकीय प्रावीण्य, त्यांची वृत्ती, जीवनदृष्टी, तळमळ आणि लेखनशैली या सर्वांसंबंधानं पुनःपुन्हा आणि गौरवानं जे म्हटलं गेलं आहे, त्याचं प्रत्यंतर या लेखामध्ये येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Utkarsh Prakashan \/ Dr. H.V. Sardesai","offer_id":51066303643946,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/NiramayJivanachePathadarshakbyDr.H.V.Sardesai.webp?v=1768892720","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/niramay-jivanache-pathadarshak-by-dr-h-v-sardesai-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%a5%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}