{"product_id":"pahile-vachan-पहिले-वचन-author-ashapurnadevi-आशापूर्णादेवी","title":"Pahile Vachan | पहिले वचन Author: Ashapurnadevi । आशापूर्णादेवी","description":"\u003cp\u003eआशापूर्णादेवी ह्या केवळ बंगालीतीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील श्रेष्ठ आणि महत्त्वाच्या लेखिका आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘पहिले वचन’ हा त्यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ ह्या कादंबरीचा अनुवाद आहे. ह्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘पहिले वचन’ ही कादंबरीची नायिका सत्यवतीची लढाई आहे, जी समाजाने ग्राह्य धरलेल्या रूढीविरुद्ध उभी राहते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतत्कालीनच नव्हे, तर आजही स्त्रीचे मन ज्याप्रकारे बाह्यजगाशी आणि स्वतःशीच संघर्ष करत राहते, अन् विद्रोही रूप धारण करून सामाजिक चौकट बदलण्याचा प्रयत्न करते, त्याचीच ही प्रातिनिधिक कादंबरी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरूढिग्रस्त निम्न मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील अडचणींसहित जगतानाच व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणे, हे अवघड काम सत्यवती करते. मनस्वी स्त्रीचा हा संघर्ष एक मोठे रूप धारण करतो. एका अर्थाने तो स्त्रीमुक्तीचा हुंकारच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआशापूर्णादेवींनी तत्कालीन स्त्रीजीवन अतिशय उत्कटतेने व प्रतिभेने चित्रित केले आहे. नायिकेच्या माध्यमातून त्यांनी आजच्याही स्त्रियांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञाच दिली आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642169860394,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PahileVachan-500x500_b591843b-50e1-4559-9173-99a8f317df20.jpg?v=1732966827","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pahile-vachan-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%a8-author-ashapurnadevi-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}