{"product_id":"paipol-पायपोळ-author-suchita-khallal-सुचिता-खल्लाळ","title":"Paipol |पायपोळ Author: Suchita Khallal |सुचिता खल्लाळ","description":"\u003cp\u003e...संयत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसोज्वळ तरीही वेदना नि रितेपण या अभिजाताच्या वाटेने जाण्याची असोशी हा सुचिता खल्लाळ यांच्या कवितेचा विशेष आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कवितांत प्रतिमा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रतीकांचा सोस नाही. की आततायी भूमिकेचा घोष नाही. मात्र ‘स्व’च्या शोधाचा एक अनाहत निरंतर ध्यास आहे. पायपोळ या शीर्षकातून अभिव्यक्त होणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअत्यंत दाह ओठ गच्च मिटून साहणारी सोशिकता ही अभिजात दु:खाशी नाळ जोडते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर काही कवितांतून मानवी नश्‍वरतेचे तत्त्वज्ञान प्रकटते. पावसाच्या कवितांमध्ये ही अनुभूती हळवी होत खोलवर झिरपत राहते आणि सांजकवितांमधून आर्त नि काळीजकातर होऊन स्मृतीभर रेंगाळत राहते. या कवितांमधून फिरून फिरून वेदनेशी सख्य जोडून राहणारी विलक्षण तलखी जितकी व्यक्तिगत असते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतितकीच ती मानुषी होऊन वैश्विकतेशी नाते जोडू लागते. गजबजाटापासून खूप दूरवर निर्जन बेटावर उमलणार्‍या रानफुलांइतकीच नवतीची तरलता असणारी ही कविता हळवेपणातल्या विशुद्ध निरागसतेने प्रमाणिक राहून तेजस्वी नि प्रखर टोकदार अस्मितेचं भान बाळगून आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cbr\u003e\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180116778,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Paypol-500x500_5f1c4145-66e4-44f2-b1db-260aed270f61.jpg?v=1732967042","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/paipol-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b3-author-suchita-khallal-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}