{"product_id":"panoti-by-mahadev-more-पनोती-महादेव-मोरे","title":"Panoti by Mahadev More पनोती - महादेव मोरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'पनोती’ ही कहाणी आहे सरदाऱ्या या ग्रामीण भागातील तरुणाची. भुरट्या चोऱ्या करणारा सरदाऱ्या आणि डोंबाऱ्याची शांती एकमेकांच्या प्रेमात असतात. सरदाऱ्याला वाटत असतं की शांतीने आणि त्याने शरीराने एक व्हावं; पण शांती टाळत असते. शांतीच्या सांगण्यावरून सरदाऱ्या नोकरी धरतो; पण शांती अचानक गावातून गायब होते. गॅरेजमधली नोकरी करत त्याची गुजराण सुरू असते. मग त्याला भेटते सुवर्णा. श्रीमंत घरातली सुवर्णा स्वत:च त्याच्या जवळ येते. त्याच्या आणि तिच्यातील सामाजिक, आर्थिक अंतराची जाणीव सरदाऱ्या तिला करून देतो; पण ती ऐकत नाही. मग दोघंही एकमेकांत गुंततात. जी अपेक्षा सरदाऱ्याने शांतीकडून केलेली असते, तीच अपेक्षा तो सुवर्णाकडून करतो; पण सुवर्णा नकार देते आणि सरदाऱ्याला भेटणं बंद करते. आता मात्र सरदाऱ्याचा संयम ढळतो आणि तो वेश्यागमन करायला लागतो, दारू प्यायला लागतो. एकदा अचानक सुवर्णा सरदाऱ्याला भेटायला येते आणि तिचं लग्न ठरल्याचं सांगते. लग्न व्हायच्या आधी तिला सरदाऱ्याला सर्वस्व अर्पण करायचं असतं. ती तिची इच्छा बोलून दाखवते; पण आता सरदाऱ्या नकार देतो; कारण त्याचं शरीर आता रोगांनी ग्रासलेलं असतं. तर अशी त्याच्या जीवनाला पनोती लागलेली असते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eThis Is The Story Of Sardarya, A Young Man From A Rural Area. Shanti And Suvarna Are Two Young Women Who Enter His Life. He Seeks Physical Intimacy From Both, But When Those Desires Remain Unfulfilled, He Turns To A Life Of Promiscuity And Alcohol, Eventually Contracting Diseases. Consequently, Even When Suvarna Later Expresses A Willingness To Surrender Herself Completely To Him, He Rejects Her.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Mahadev More","offer_id":52374830711082,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/PanotibyMahadevMore.jpg?v=1787724116","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/panoti-by-mahadev-more-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}