{"product_id":"parikshane-aani-nirikshane-परीक्षणे-आणि-निरीक्षणे-author-murlidhar-saynekar-मुरलीधर-सायनेकर","title":"Parikshane Aani Nirikshane|परीक्षणे आणि निरीक्षणे Author: Murlidhar Saynekar | मुरलीधर सायनेकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रा. मुरलीधर सायनेकर हे नाव मराठी समीक्षाक्षेत्रात एक गंभीर, चिकित्सक व शोधक वृत्तीचे समीक्षक म्हणून केव्हाचेच सुस्थिर झालेले आहे. त्यांचा\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘परीक्षणे आणि निरीक्षणे’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा नवा समीक्षालेखसंग्रह त्यांच्या या वृत्तीचाच द्योतक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया संग्रहात वि. ना. ढवळे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनरहर कुरुंदकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस. गं. मालशे,\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eभीमराव कुलकर्णी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचंद्रकांत बांदिवडेकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eविजया राजाध्यक्ष,\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eअरुण टिकेकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eव्यंकटेश माडगूळकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eदया पवार इत्यादी मान्यवरांच्या ग्रंथांची सर्वांगसुंदर परीक्षणे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमराठी ग्रंथांबरोबरच या संग्रहात\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘आफ्टर ऍम्नेशिया’,\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘इन थिअरी...’, ‘अ डिक्शनरी ऑफ वर्ल्ड मायथॉलॉजी’,\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘द एन्सायक्लोपीडियाज् ऑफ इण्डिया’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eइत्यादी भारतीय साहित्य व संस्कृती यांच्या विचाराकरिता महत्त्वाच्या अशा इंग्रजी\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eग्रंथावरील समतोल समीक्षणेही समाविष्ट आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रा. सायनेकर यांच्या समीक्षापद्धतीचा विशेष म्हणजे ते ग्रंथांच्या गुणदोषदिग्दर्शनापाशीच न थांबता त्या त्या ग्रंथाच्या निमित्ताने साहित्यतत्त्वांची मूलभूत चर्चाही करतात. अशी चर्चा कधीकधी ते कुसुमाग्रज,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजी. ए.,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसीमस हीनी यांसारख्या भारतीय व पाश्चात्त्य लेखकांच्या प्रज्ञाप्रतिभेचा वेध घेणारे टिपण-लेख लिहूनही करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रा. सायनेकर यांचा हा सशक्त व सुंदर समीक्षालेखसंग्रह आजच्या मराठी समीक्षासृष्टीमध्ये उठून दिसणारा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642187260202,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ParikshaneAninirikshane-500x500_249a6d02-da1c-4881-82c2-d416c70840c1.jpg?v=1732967215","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/parikshane-aani-nirikshane-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a5%87-author-murlidhar-saynekar-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}