{"product_id":"pasturi-पस्तुरी-author-dr-d-b-kulkarni-डॉ-द-भि-कुलकर्णी","title":"Pasturi|पस्तुरी Author: Dr. D. B. Kulkarni|डॉ. द. भि. कुलकर्णी","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसमीक्षक दभिंची कीर्ती त्यांच्या ठिणगीसारख्या वाङ्मयीन टिपणांसाठी आहे. खूप दिवसांनंतर दभि आता पुन्हा अशा टिपणांकडे वळले आहेत. ही खरोखरच मराठी रसिकांना त्यांना दिलेली पस्तुरी आहे. या लेखनसंग्रहात प्रतिभा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिर्मितीप्रक्रिया, आस्वादप्रक्रिया इत्यादी कलाप्रक्रियांचे तात्त्विक पण अनौपचारिक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचिंतनशील आणि प्रतीतिनिष्ठ विवेचन आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरेव्हरंड टिळक, कुसुमाग्रज,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eगदिमा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपु. शि. रेगे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमर्ढेकर इत्यादी श्रेष्ठ कवींच्या काव्यकृतींचा समीक्षागर्भ अस्वादही आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eयाशिवाय आचार्य अत्रे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआनंदीबाई शिर्के,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसी. रामचंद्र,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमाधवी देसाई,कुमार सप्तर्षी यांच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी येथे सादर केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमध्येमव्यायोग,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएडिपस रेक्स,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरात्रीचा दिवस,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकैरी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eभोवरा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eदूत, गंगार्पण अशा अक्षर साहित्यकृतींचीही नवी आकलने इथे लेखकाने सादर केली आहेत. सौंदर्यशास्त्र आणि ललित गद्य यांना आत्मसात करून हे समीक्षालेखन प्रकटले आहे. ‘पस्तुरी’चे हे वैशिष्टय आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642187063594,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Pasturi-500x500_dde4746a-38fa-4004-9c7d-c625f304e237.jpg?v=1732967212","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/pasturi-%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-author-dr-d-b-kulkarni-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6-%e0%a4%ad%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}