{"product_id":"rahasya-रहस्य-by-ganesh-mahadev","title":"Rahasya रहस्य by Ganesh Mahadev","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजंगलतोड, पर्यावरण हानी, बकाल खेडी, भ्रष्ट पुढाऱ्यांची पिलावळ, दिशाहीन समाजरचना, वनरक्षक-वनकर्मचारी, गावगुंड आमदार, व्याघ्र-प्रकल्प अशा संदर्भांची उपलब्धता कथेचा प्रवाह आधुनिकतेशी व वर्तमानाशी जुळवून ठेवतो. प्रा. गोरक्षनाथ, तलाठी साळुंखे, आर्यभारती, वनकर्मचारी लांजेवार अशा अनेक व्यक्तिरेखांनी वर्तमानाचे भान पेरले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eव्यक्तिनमुन्यांची विविधता हा या कादंबरीचा ‘विशेष’ गुण म्हणता येतो. संशोधक, नेता, तलाठी, राजघराण्यातील नायक या व्यक्तित्वांच्या साक्षी इथे आहेतच; पण तंत्रविद्येत प्रवीण असणाऱ्या साधकांचा गोतावळासुद्धा इथे प्रभावी ठरलाय.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकथानकातील गूढ वातावरणनिर्मिती हेच या कादंबरीचे मुख्य सामर्थ्य आहे. सत्प्रवृत्ती व अपप्रवृत्तींसह अनेक प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा साकार करून गूढ वलयांकित कथानकाची चाकोरीबाहेरची भन्नाट ‘रहस्यमय’ कादंबरी गणेश महादेव यांनी मराठी सारस्वतांच्या दरबारात रुजू केलीय. इतिहास, पुराण, तत्त्वज्ञान, नाथ संप्रदायाचे अंतरंग व परंपरा, तंत्रविद्येचा गाभा व विधी, त्यामधील विशिष्ट प्रकार व संस्कार, भाषिक रूपे या सर्वांचा लेखकाचा सूक्ष्म अभ्यास गौरवास्पद आहे. कथाप्रवाहातील व्यक्ती व घटना-प्रसंगाचा अनुबंध सुंदर गुंफला गेलाय. अध्यात्म व आधुनिकता, भोगवाद आणि त्याग-तपश्चर्या, शुद्धता व अशुद्धता या सर्वच द््वंद््वांचे लेखकाचे आकलन सम्यक आहे. गूढ रहस्यात गुंतून जाणाऱ्या रसिक-वाचकांसाठी हा कादंबरी लेखनाचा प्रयोग निश्चितच गौरवास्पद म्हणावा लागेल.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625699320106,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Cover_Front-300x464_79158cff-5c47-4242-a9f8-022a5d3a0db9.jpg?v=1732609474","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rahasya-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af-by-ganesh-mahadev","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}