{"product_id":"rajkiya-vichar-ani-vicharvant-by-v-g-nandekar-राजकीय-विचार-आणि-विचारवंत","title":"Rajkiya Vichar Ani Vicharvant by V. G. Nandekar राजकीय विचार आणि विचारवंत","description":"\u003cspan\u003eमानवी संघटनांच्या विकासात राजकीय समाज ही एक महत्त्वाची उत्क्रांत अवस्था मानली जाते. जाणीव व जागरूकता ही तिची वैशिष्ट्ये आहेत. समाजनिर्मितीचा मूळ हेतू, संस्थांचे संघटन, त्यांचे आंतरसंबंध तसेच व्यक्ती व संस्थांचे नैसर्गिक व न्याय्य नाते ह्यांविषयी एक तर्कसंगत चौकट निर्माण करण्याचा आणि त्या आधारे समाजातील बदल सुसंगत, सातत्यपूर्ण व सकारात्मक करण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञांनी केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुरुवातीपासूनच आदर्शवाद व व्यवहारवाद ह्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न राजकीय तत्त्वज्ञांनी केलेला दिसून येतो. प्लेटोच्या आदर्शवादाबरोबर ऍरिस्टॉटलचा व्यवहारवाद हा नैसर्गिक अपघात नसून ऐतिहासिक अनिवार्यता आहे. राजकीय तत्त्वज्ञांनी देशकालपरत्वे व्यक्ती व राज्यसंस्थेचे नाते सघन व सजग करण्याचा मार्ग शोधलेला आहे. सामाजिक करार, वर्गसंघर्ष, उदारव्यक्तिवाद, व्यक्तीचे सबलीकरण हे सर्व गतिमान समतोल निर्मिण्याचे बहुविध मार्ग आहेत. यांचा मागोवा विकसनशील देशांच्या संदर्भातही राज्यशास्त्राच्या विद्यार्थी - वाचकांना उपयुक्त होईल. ‘राजकीय विचार आणि विचारवंत’ ह्यामध्ये अशी दिशा जाणीवपूर्वक देण्याचा हेतू साधलेला आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641823207722,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/543f_1024x1024_2x_aa300746-2c6b-40e3-b630-fb0b958878d1.webp?v=1732963026","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rajkiya-vichar-ani-vicharvant-by-v-g-nandekar-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}