{"product_id":"rashtra-nirmanaat-adivasi-by-dr-jitendra-meena-राष्ट्र-निर्माणात-आदिवासी","title":"Rashtra Nirmanaat Adivasi by Dr. Jitendra Meena राष्ट्र निर्माणात आदिवासी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eRashtra Nirmanaat Adivasi is a thought-provoking Marathi book by Dr. Jitendra Meena, expertly translated by Madhavi Bhat. ज्या समुदायाचा इतिहास नसतो, त्याचे ना वर्तमान असते, ना भविष्य. आदिवासी समुदायांचा इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील कथा नव्हेत, तर आजचे वास्तव आणि उज्वल उद्याचा पायासुद्धा आहेत. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेल्या इतिहासाच्या पानांकडे – आदिवासींचे संघर्ष, बलिदान आणि त्यांची स्वप्ने – हे पुस्तक लक्ष वेधते. भारताच्या सर्वांत प्रदीर्घ प्रतिकाराच्या इतिहासास परिघावर का ठेवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून, कोणकोणत्या सामाजिक-आर्थिक शक्तींनी असे केले, याचा उलगडाही हे पुस्तक करते. यात आदिवासी संघर्षाच्या स्मृतींना ‘राष्ट्राच्या परिघातून’ उचलून ‘राष्ट्राचा आत्मा’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक वाचताना लक्षात येते की आदिवासींना दुहेरी लढा द्यावा लागला – पहिला, ब्रिटिशांविरुद्ध आणि दुसरा, स्थानिक उच्चभ्रूंच्या लूटमारीविरुद्ध. हे पुस्तक इतिहासाला आदिवासी दृष्टिकोनातून पाहण्याची, समजून घेण्याची संधी देते – असा दृष्टिकोन ज्याचे बहुधा दमन करण्यात आले आहे. ‘राष्ट्र निर्माणात आदिवासी’ हे पुस्तक इतिहासाच्या मौनाचा प्रभावी प्रतिध्वनी आहे आणि ज्या प्रश्नांपासून इतिहास दीर्घकाळ लपत राहिला त्या प्रश्नांची दखलसुद्धा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Dr. Jitendra Meena","offer_id":51071031116074,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/RashtraNirmanaatAdivasibyDr.JitendraMeena.jpg?v=1768972448","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/rashtra-nirmanaat-adivasi-by-dr-jitendra-meena-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}