{"product_id":"sadako-aani-kagadi-bagale-सादाको-आणि-कागदी-बगळे-by-author-eleanor-coerr","title":"Sadako Aani Kagadi Bagale | सादाको आणि कागदी बगळे  by AUTHOR :- Eleanor Coerr","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003ctable width=\"555\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"555\"\u003eही गोष्ट आहे जपानमधील चिमुरड्या सादाकोची.\u003cbr\u003eदुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर पहिला अॅटमबॉम्ब टाकला, तेव्हा ती केवळ\u003cbr\u003eदोन वर्षांची होती.\u003cbr\u003eनऊ वर्षांनी सादाकोला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला.\u003cbr\u003eविनाशकारी बॉम्बच्या विषारी किरणांनी तिचं सुंदर, निरागस बालपण झाकोळलं\u003cbr\u003eआणि या गोड, गुणी, चुणचुणीत हसऱ्या सादाकोची मृत्यूशी झुंज सुरू झाली.\u003cbr\u003eचिझुको तिची वर्गातली मैत्रीण. सादाकोला भेटायला दवाखान्यात येते. एक\u003cbr\u003eसोनेरी कागद दाखवत सांगते, “आजारी व्यक्तीनं जर एक हजार कागदी बगळे\u003cbr\u003eतयार केले, तर देव त्याची इच्छा पूर्ण करतो, त्याला निरोगी बनवतो.” आणि\u003cbr\u003eसादाकोची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती उसळून येते.\u003cbr\u003eहसतमुखाने एक-एक कागदी बगळा बनविताना कॅन्सरशी चिवट झुंज सुरू राहते.\u003cbr\u003eया जिद्दी सादाकोचं पुढं काय होतं? ती वाचली काय?\u003cbr\u003eआज जगभर सत्तासंघर्षाच्या अभिलाषेनं आणि उग्र दहशतवादाच्या विध्वंसक\u003cbr\u003eप्रवृत्तीनं ग्रासलं आहे. जागोजागी हिंसक प्रकार डोकं वर काढीत आहेत आणि\u003cbr\u003eयात सादाकोसारखे निष्पाप बळी जात आहेत.\u003cbr\u003eअशा वेळी विश्वमानवता, विश्वशांतीची आठवण करून देणाऱ्या सादाकोच्या शांती\u003cbr\u003eस्मारकावरील ओळींचा संदेश आज वर्तमानाची गरज वाटू लागते.\u003cbr\u003eआमचा हा आक्रोश आहे,\u003cbr\u003eहीच आमची प्रार्थना,\u003cbr\u003eजगात या शांती लाभो !\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641979609386,"sku":null,"price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FinalDesignE-Book-19-340x520_39775011-9144-463f-a7ac-26f6fd342892.jpg?v=1732964357","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sadako-aani-kagadi-bagale-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8b-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87-by-author-eleanor-coerr","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}