{"product_id":"sahityashastra-swaroop-aani-samasya-साहित्यशास्त्र-स्वरूप-आणि-समस्या-author-vasant-patankar-वसंत-पाटणकर","title":"Sahityashastra :Swaroop Aani Samasya |साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या Author: Vasant Patankar | वसंत पाटणकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसाहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या या पुस्तकात ‘साहित्य’ या संकल्पनेची व्यामिश्रता व वादग्रस्तता लक्षात घेऊन मांडणी केली आहे. या व्यामिश्रतेची व वादग्रस्ततेची कल्पना विद्यार्थ्यांना यावी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया गोष्टींमुळे साहित्याच्या संदर्भात निर्माण होणार्‍या विविध प्रश्नांचे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवादांचे भान त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसा प्रयत्न येथे केला आहे. असे भान त्यांच्यात निर्माण झाले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर साहित्याच्या संदर्भातील अनेकविध प्रश्नांचे सविस्तर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसखोल आकलन त्यांना होऊ शकेल. अशा प्रकारच्या कोणत्याही मांडणीमागे साहित्याविषयीची एक विशिष्ट भूमिका क्रियाशील असते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतशी ती येथेही आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे आवर्जून नमूद करावयास हवे. यापेक्षा वेगळी साहित्यविषयक (व पर्यायाने जीवनविषयक) भूमिका असणार्‍या अभ्यासकाची प्रस्तुत विषयाची मांडणी भिन्न स्वरूपाची असू शकेल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाची कल्पना आहे. येथे अपरिहार्यपणे एका विशिष्ट भूमिकेतून जरी मांडणी झालेली असली,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतरी इतर भूमिकांनाही येथे योग्य तो वाव दिला आहे. कवी व समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. वसंत पा.णकर हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cem\u003eविजनांतील कविता\u003c\/em\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(१९८३) हा काव्यसंग्रह आणि\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cem\u003eकविता : संकल्पना\u003c\/em\u003e\u003cem\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनिर्मिती आणि समीक्षा\u003c\/em\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(१९९५) हा काव्यसमीक्षापर लेखसंग्रह ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यांखेरीज त्यांनी अनेक समीक्षात्मक पुस्तके स्वतंत्रपणे व सहकार्याने संपादित केली आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी आपले शोधनिंबधही सादर केले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha prakashan \/ Marathi","offer_id":49642192339242,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SahityashastraSwaroopAaniSamasya-500x500_6b96a23a-076b-4d81-b607-48e82259af32.jpg?v=1732967301","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahityashastra-swaroop-aani-samasya-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-author-vasant-patankar-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}