{"product_id":"sahityavimarsha-साहित्यविमर्श-by-author-ramesh-warkhede","title":"Sahityavimarsha | साहित्यविमर्श  by AUTHOR :- Ramesh Warkhede","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eसाहित्यशास्त्रीय मर्मदृष्टीतून केलेले साहित्याचे रसग्रहण व मूल्यमापन हे\u003cbr\u003eया ग्रंथाचे सर्वसाधारण स्वरूप आहे. या लेखसंग्रहात पुस्तक परीक्षण, स्फुट\u003cbr\u003eटिपणे आणि विवरणात्मक निबंध अशा त्रिविध स्वरूपाचे लेखनाचे आकृतिबंध\u003cbr\u003eआलेले आहेत. मराठीतील लयतत्त्वचर्चेपासून स्वतंत्र सौंदर्यशास्त्राच्या\u003cbr\u003eमागणीपर्यंत अनेक सैद्धांतिक प्रश्नांचा मागोवा घेणारे विवरणात्मक निबंध;\u003cbr\u003eशासन, साहित्य व समाज यातल्या अनुबंधांविषयीच्या वैचारिक चर्चा या\u003cbr\u003eपुस्तकात आलेल्या आहेत. लक्ष्मणशास्त्री हळबे, पु. शि. रेगे, प्रभाकर पाध्ये,\u003cbr\u003eभाऊ पाध्ये, गौरी देशपांडे, भारत सासणे, बाबा भांड इत्यादींच्या प्रायोगिक\u003cbr\u003eलेखनाची आंतर्ज्ञानशाखीय मूल्यदृष्टीतून केलेली चिकित्सा ही या पुस्तकाची\u003cbr\u003eजमेची बाजू आहे. या ग्रंथातून साहित्याच्या अध्यापनाच्या दिशा,\u003cbr\u003eवाङ्मयेतिहासाच्या सुकाणूशास्त्राची मांडणी, भारतीय आणि पाश्चिमात्य\u003cbr\u003eसाहित्यशास्त्रातील संकल्पनांचे उपयोजन, तुकारामांपासून शिरवाडकरांपर्यंत\u003cbr\u003eमराठीतील साहित्यविचाराचे अन्वेषण अशा विविध विषयांवरच्या चर्चाविश्वाचे\u003cbr\u003eदर्शन घडते. आदिबंधात्मक समीक्षा, संज्ञापनविद्या, दास्यविमोचनात्मक\u003cbr\u003eज्ञानशास्त्र, जनवादी साहित्यशास्त्र, स्त्रीवादी समीक्षा अशा समीक्षेतील विविध\u003cbr\u003eप्रवाहांचे उपयोजन ही या समीक्षालेखांची खासियत आहे.\u003cbr\u003eग्रंथलेखक रमेश नारायण वरखेडे यांचा महाराष्ट्राला अनुष्टुभचे संस्थापक\u003cbr\u003eसंपादक, धुळ्याच्या मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे संस्थापक संचालक,\u003cbr\u003eयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक\u003cbr\u003eशास्त्रे विद्याशाखेचे संचालक, अनुदेशन तंत्रविज्ञान आणि विविध प्रकारच्या\u003cbr\u003eपाठ्यपुस्तक व अध्ययन साहित्याची निर्मिती करणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून\u003cbr\u003eपरिचय आहे. यापूर्वी समाजभाषाविज्ञान, व्यावहारिक मराठी, संज्ञापनशास्त्र,\u003cbr\u003eभाषांतरविद्या, लोकसाहित्य, वृत्तपत्रविद्या इत्यादी विषयांवर त्यांचे\u003cbr\u003eलेखनसंपादन प्रसिद्ध झाले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या भाषणांचे\u003cbr\u003eपाच खंडही त्यांनी विस्तृत प्रस्तावनांसह संपादित केले आहेत. त्यांच्या या\u003cbr\u003eआंतर्विद्याशाखीय प्रवासाचा आणि व्यासंगाचा पडताळा या लेखसंग्रहातूनही\u003cbr\u003eमिळतो.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641978495274,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sahitya-Vimarsh-14-SpinM-340x520_b5e989b6-2579-4b9d-83b2-edd6bc16b5f8.jpg?v=1732964349","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sahityavimarsha-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-by-author-ramesh-warkhede","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}