{"product_id":"samkalin-rajkiy-chalvali-समकालीन-राजकीय-चळवळी-by-prakashn-pawar","title":"Samkalin Rajkiy chalvali समकालीन राजकीय चळवळी  by Prakashn Pawar","description":"\u003cp\u003eसमकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व व जातसंघटना हे पुस्तक तीन विभागांत विभागले आहे. पहिला भाग सोशल इंजिनिअरिंगच्या राजकीय प्रक्रिया व चळवळीवर बेतलेला आहे. नवहिंदुत्व या घटकाच्या आधारे कृतिसज्जता कशी घडली या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठा समाजामध्ये कॉंग्रेसविरोध, सहकार चळवळविरोध, उच्च जातीविरोध, ओबीसी विरोध, अभिजन विरोध असा आर्थिक व राजकीय असंतोष धुमसत आहे, त्यांचेही स्पष्टीकरण केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्वदीनंतरच्या राजकारणाचे जातसंघटना हे एक वैशिष्ट्य ठरतेे. ओबीसी व दलित समाजातील जात संघटनांचे गेल्या तीन दशकातील केलेले राजकीय दावे, भौतिक हितसंबंधाची स्पर्धा आणि अस्मितांचे राजकारण तसेच गेल्या तीन दशकातील ओबीसी व दलित राजकारणांचे अर्थ स्पष्ट केले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनवहिंदुत्व चळवळीतील सत्तासंघर्ष व सत्तासंपादनाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रकल्प व हिंदू राष्ट्रनिर्मितीची चळवळ, जात-संघटनांच्या चळवळीतील इतर मागासवर्ग व अभिजनांमधील सत्तासंघर्षदेखील सविस्तरपणे मांडला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनवहिंदुत्व आणि जातसंघटना यांचे राजकीय चळवळ या चौकटीत विश्लेषण करणारे हे पहिलेच पुस्तक आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते - कार्यकर्ते व समर्थक - विरोधक यांना अभ्यासासाठी या पुस्तकातून नवे मुद्दे मिळू शकतील, अशी खात्री आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641841688874,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/580f_1024x1024_2x_bd58f9e6-30e7-4a4f-bb46-681f838dcf30.webp?v=1732963196","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/samkalin-rajkiy-chalvali-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80-by-prakashn-pawar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}