{"product_id":"sankalpapoorti-chhandatoon-vyavasayakade-by-rashmi-hrushikesh-godse","title":"Sankalpapoorti : Chhandatoon Vyavasayakade by Rashmi Hrushikesh Godse","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eआरी भरतकामापासून लेखनकलेपर्यंत आणि फुलांच्या सजावटीपासून ते नेलआर्टपर्यंत विविध कलागुणांची आणि त्यांवर आधारित व्यवसायांची माहिती या पुस्तकात मिळते.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eहे पुस्तक छंदातून व्यवसाय कसा उभारावा याची तपशीलवार माहिती देते.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eव्यवसाय करताना येणाऱ्या आणि अडचणी संकटे यांवर यशस्वीपणे मात कशी करावी करावी, याची निवडक सूत्रे या पुस्तकात वाचायला मिळतात.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eहे पुस्तक सुगम व रसाळ शैलीत आणि संवादी भाषेत लिहिले गेले असल्यामुळे कमालीचे वाचनीय झाले आहे.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखकांविषयी :\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eरश्मि हृषिकेश गोडसे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया एम. कॉम. पदवीधर आहेत, शिवाय त्यांनी पुण्याच्या सिम्बॉयसिस या शिक्षण संस्थेतून ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ पूर्ण केला आहे.\u003cbr\u003eशालेय जीवनात विविध वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली आहेत.\u003cbr\u003eपुण्यातील एका नामांकित खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्षे लेखापाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी निभावली आहे.\u003cbr\u003eकोव्हिड काळामध्ये संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक छंद जोपासले. ज्यामध्ये क्रोशेवर्क, कॅण्डल मेकिंग, वॉटरफॉल मेकिंग यांचा समावेश होता.\u003cbr\u003eत्यामुळे विविध छंदांवर आधारलेल्या त्यांच्या या प्रथम पुस्तकाच्या संपादनाचे काम त्यांनी मनापासून आणि आवडीने केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रा. डॉ. सुभाष भावे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एल.एल.बी., एम.बी.ए. या पदव्या संपादन केल्या आहेत.\u003cbr\u003eइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) अहमदाबाद या अग्रगण्य संस्थेचे ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत.\u003cbr\u003e१९६६ मध्ये एम.बी.ए. पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे स्वतःचा व्यवसाय केला.\u003cbr\u003e१९८६ ते १९९९ पर्यंत त्यांनी ‘ना. ग. नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च’ या संस्थेत संचालक म्हणून काम केले.\u003cbr\u003eआजपर्यंत त्यांची विविध विषयांवरील बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘श्री हनुमान चालीसा’ या त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे, तर कानडी व गुजराथी भाषेमध्ये अनुवादाचे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच ही पुस्तके प्रकाशित होतील.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Rashmi Hrushikesh Godse","offer_id":50256954491178,"sku":"Rashmi Hrushikesh Godse","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5542-thickbox_default.jpg?v=1748771487","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sankalpapoorti-chhandatoon-vyavasayakade-by-rashmi-hrushikesh-godse","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}