{"product_id":"satyashodhakiya-niyatkalike-by-arun-shide-सत्यशोधकीय-नियतकालिके-अरुण-शिंदे","title":"Satyashodhakiya Niyatkalike by Arun Shide सत्यशोधकीय नियतकालिके अरुण शिंदे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. डॉ. अरुण शिंदे यांचे तरुण पिढीतील प्रभावी आणि व्यासंगी संशोधकांमध्ये स्थान उच्च असून त्यांचा 'सत्यशोधकीय नियतकालिके' हा नवीन ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सक दृष्टिकोनाची साक्ष देणारा आहे. ते विपुल स्वरूपाचे वैचारिक लेखन करीत असले, तरी सत्यशोधकीय साहित्य हा त्यांचा संशोधनाचा खास आत्मीय विषय आहे. आधुनिक काळात महात्मा फुल्यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात आणि इतिहासात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच एक सत्यशोधकीय पत्रकारिताही बहरली. डॉ. शिंदे यांनी या पत्रकारितिचा चिकित्सक अभ्यास वाचकांना सादर करताना “दीनबंधु, “दीनमित्र', शेतकऱ्याचा कैवारी', 'जागृति', “विजयी मराठा', राष्ट्रवीर', 'प्रबोधन', 'हंटर', 'सत्यवादी', 'कैवारी' अशा साठहून अधिक नियतकालिकांचा आढावा आपल्या या ग्रंथात घेतला आहे. माझ्या माहितीनुसार असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत ताता तात व - हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे. त्यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाड्मयीन मूल्यही चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून केले आहे. ज्यांना आपल्या क्रांतिकारक भूतकाळाविषयी अता आहे आणि याच्या वनय सयाला. आहे आणि ज्यांच्या मनात समाजाच्या आणि जे आपल्या भावी पिढ्यांसाठी देखणी आणि निरामय स्वप्ने पहात आहेत, त्या सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. एका दृष्टीने हा ग्रंथ सर्वच मराठी वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी प्रकाशाची एक नवी वाट निर्माण करीत आहे, यात शंका नाही. मी डॉ. शिंदेंचे या ग्रंथाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना अशाच भरीव व कसदार लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आता आमच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत, याची त्यांना मुद्दाम आठवण करून देतो ! - डॉ. आ. ह. साळुंखे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Krishna Sanshodhan Va Vikas Academy Mangalweda \/ Arun Shinde","offer_id":49900113527082,"sku":"","price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Satyashodhakiya_Niyatkalike.png?v=1761221665","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/satyashodhakiya-niyatkalike-by-arun-shide-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}