{"product_id":"saundarya-aani-vangmay-by-motiram-katare","title":"Saundarya Aani Vangmay By: Motiram Katare","description":"\u003cp\u003eबुद्ध नीतीला सौंदर्याची राणी समजतात; त्यामुळे नीती (सदाचार), सत्य, मानुषता व न्याय आणि निब्बाण ही सौंदर्यतत्त्वे प्रतिपादली आहेत. बौद्ध वाङ्मयात केंद्रवर्ती आहे. त्यालाच सौंदर्यशास्त्रात केंद्रवर्ती केले आहे. बुद्धाचा सौंदर्यविचार हा ज्ञानात्मक आहे. पहिल्या प्रवचनातच चार आर्यसत्ये सांगतांना त्यांनी हे स्पष्ट केले आहे. माणसाला दुःखातून बाहेर काढायचे असेल तर त्याला दुःख कुठून निर्माण होते हे कळायला हवे. दुःखनिरोधासाठी कोणता मार्ग अवलंबायचा आणि जीवनात दु:ख पुन्हा निर्माण होणार नाही हे सांगण्याच्या जबाबदारीतून त्यांच्या नीतिविचारांचा जन्म झाला, नीतीत सौंदर्य असते. हे सांगणारा बुद्धच आहे. नीती जर सौंदर्यपूर्ण असेल तर ज्ञान सौंदर्यपूर्ण कसे नसेल? मी सौंदर्यशास्त्राचा समग्र इतिहास तपासला तर बुद्धाच्या आधी कुणी झालेला नाही. त्यामुळे तो सौंदर्यशास्त्राचा जनक आहे या मताला मी आलो आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'लिटरेचर या इंग्रजी शब्दाचे 'साहित्य' हे चूक भाषांतर आहे.' त्यामुळे साहित्य हा शब्दप्रयोग न वापरता वाङ्मय हा शब्दप्रयोग करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५४ सालात सांगून ठेवले आहे. ते स्वत:ही साहित्य शब्दप्रयोग न वापरता वाङ्मय शब्दप्रयोग वापरत असत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sanskruti Prakashan \/ Marathi","offer_id":49641571123498,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1sau041_0f7de11f-9c6d-4a74-a8dc-01e3801ea0b4.jpg?v=1732960122","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/saundarya-aani-vangmay-by-motiram-katare","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}