{"product_id":"savayi-badala-aayushya-badalel-सवयी-बदला-आयुष्य-बदलेल-by-author-dr-wayne-w-dyer","title":"Savayi Badala Aayushya Badalel | सवयी बदला आयुष्य बदलेल  by  AUTHOR :- Dr. Wayne W. Dyer","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eजुन्या सवयी सुटणे फार कठीण असते असे म्हटले जाते. म्हणजे\u003cbr\u003eसुरुवातीपासूनच्या आपल्या विचार करण्याच्या पद्धती बदलणे जवळजवळ\u003cbr\u003eअशक्यप्राय असल्याचे त्यातून स्पष्ट होते. तरीही विचार आणि कृती\u003cbr\u003eकरण्याच्या पद्धती बदलू नयेत म्हणून कडेकोट बंदोबस्त केला तरी तुमच्या\u003cbr\u003eहातात आता जे पुस्तक आहे, त्याच्या वाचनाने त्या सवयी पूर्णपणे बदलता\u003cbr\u003eयेतील, या विश्वासानेच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. एवढेच नव्हे तर\u003cbr\u003eज्या पद्धतींमुळे अशा प्रकारे विचार करण्याच्या सवयी निर्माण झाल्या आहेत\u003cbr\u003eआणि त्यांना सतत पाठिंबा मिळत आहे त्या समूळ नष्ट करण्यासाठी उत्तम\u003cbr\u003eउपाय म्हणजे त्या पद्धतींवर आणि व्यवस्थेवर मुळातूनच घाव घालणे!\u003cbr\u003eआपल्या विचारांच्या समर्थनासाठी तयार केलेली स्पष्टीकरणांची भलीमोठी\u003cbr\u003eयादी आणि आपण उभारलेली संरक्षणयंत्रणा यामळे जी व्यवस्था आकारास आली, तिचे वर्णन एका शब्दात करता येईल : ‘सबबी.’ त्यामुळेच तुमच्या\u003cbr\u003eस्वतःसाठी आणि तम्ही निर्माण केलेल्या आणि स्वीकारलेल्या\u003cbr\u003eस्पष्टीकरणांसाठी चपखल उत्तर म्हणजे ‘सवयी बदला, आयुष्य बदलेल! हे\u003cbr\u003eपुस्तक. या सर्व सबबी नाहीशा व्हाव्यात, हाच याचा उद्देश आहे!\u003cbr\u003eखरोखर, अगदी याक्षणी आणि येथेच तुम्हाला एक योग्य मार्ग मिळणार\u003cbr\u003eआहे. तुमची स्वतःची ओळख असलेले; परंतु आता तुम्हाला नकोसे असलेले\u003cbr\u003eव दीर्घकाळापासून जोपासलेले विचार तुम्ही दूर सारू शकता. तुमच्यामध्ये\u003cbr\u003eखोलवर रुजलेल्या विचार करण्याच्या सवयी तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे\u003cbr\u003eव्यक्तित्व घडवण्याच्या आड येतात; पण आता तुम्ही तुमचे आयुष्य बदलू\u003cbr\u003eशकता आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जगू शकता – बस्स. सबबी सांगणं\u003cbr\u003eबंद करा आणि विचारसवयी बदला!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641973023018,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Savayee-Badla-Aushya-Badlel-Spine-17M-340x520_b019756e-293e-42c4-99e0-d09c224a88cc.jpg?v=1732964296","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/savayi-badala-aayushya-badalel-%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2-by-author-dr-wayne-w-dyer","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}