{"product_id":"sayajirao-gaekwad-yanchee-bhashane-3-सयाजीराव-गायकवाड-यांची-भाषणे-खंड-3-by","title":"Sayajirao Gaekwad Yanchee Bhashane 3 | सयाजीराव गायकवाड यांची भाषणे खंड 3  by","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eमहाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1875 ते 1939 या चौचष्ट वर्षांच्या कारकिर्दीत बडोदे संस्थानात आधुनिक लोकतंत्री शासनपद्धतीचा अनोखा प्रयोग केला.\u003cbr\u003eराज्य चालविणे हे शास्त्र आहे त्यासाठी राजा ज्ञानी असला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी जगभरातील राजकीय प्रशासनपद्धतींचा अभ्यास केला आणि स्वत:च्या राज्यात सुशासनाचे अनेक प्रयोग राबविले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्या जगभर ‘गुड गव्हर्नन्स’साठी विविध पातळ्यांवर प्रयोग व प्रशिक्षणाचे कार्यक्रम चालू आहेत.\u003cbr\u003eया पार्श्वभूमीवर बडोद्याच्या राजकीय सुधारणांचे नव्याने चिंतन व अनुसरण व्हायला पाहिजे या भूमिकेतून महाराजांच्या राज्यप्रशासनविषयक निवडक भाषणांचे संकलन या तिसर्या खंडातून प्रसिद्ध केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकागदी राज्यघटनेपेक्षा कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि सामाजिक पुनर्घटनेवर भर दिला पाहिजे हा सयाजीरावांचा दृष्टिकोन या भाषणातनू आपल्याला कळतो.\u003cbr\u003eजनतेला नागरी हक्कांबरोबरच राजकीय सत्तेत सहभाग,\u003cbr\u003eधर्ममूल्ये आणि नागरी मूल्ये यांची सांगड, अल्पसंख्याकांचे संरक्षण, श्वासत विकासाठी जमीनसुधारणा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळणाच्या संसाधनांचा विकास व सामान्यांना विकासाची फळे चाखता यावी यासाठी समन्यायी वितरण व सामान्यांना विकासाची फळे चाखता यावी यासाठी समन्याची वितरण यावर त्यांचा भर होता.\u003cbr\u003eराष्ट्राची प्रगती होण्यासाठी कर्तबगार माणसे लागतात या जाणिवेतून सयाजीरावांनी विविध खात्यातील लोकसेवकांच्या कर्तव्याची संहिता तयार केली व त्यांना राज्यप्रशासनाचे प्रशिक्षण दिले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया राजकीय प्रयोगांची हकिगत असलेली ही भाषणे लोकप्रशासनाच्या दृष्टीने एखाद्या राज्योपनिषदासारखी आहेत.\u003cbr\u003eसुप्रशासनासाठी लागणारे बौद्धिक चैतन्य निर्माण करण्याची क्षमता ठासून भरलेली ही भाषणे जागरूक नागरिक, शासकीय अधिकारी, कामगार संघटनांचे नेते व राज्यकार्त्यांना प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641971777834,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sayajirao-Gaikwad-Yanchee-Bhashane-3-M_77db0911-3e7e-4210-8c12-28485b0de177.jpg?v=1732964282","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sayajirao-gaekwad-yanchee-bhashane-3-%e0%a4%b8%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-3-by","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}