{"product_id":"sea-of-poppies-सी-ऑफ-पॉपीज-author-amitav-ghosh-अमिताव-घोष-अनु-कुमार-नवाथे","title":"Sea of Poppies | सी ऑफ पॉपीज Author: Amitav Ghosh | अमिताव घोष अनु. कुमार नवाथे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘इबिस’ हे एक विशाल जहाज आहे. हिंदी महासागरातील मॉरिशियस बेटाकडे जाणार्‍या या जहाजामध्ये नाविक आहेत, फरार निर्वासित आहेत, कामगार व कैदी आहेत. एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादाच्या काळात नियती काही भारतीय व पाश्चिमात्य मूळ असलेल्या, विविध क्षेत्रांतील लोकांना या जहाजावर एकत्र घेऊन येते - त्यात एक कंगाल राजा आहे, खेड्यातील एक विधवा स्त्री आहे, गुलामीतून मुक्त झालेला अमेरिकन आहे व स्वच्छंद, मनस्वी, अनाथ युरोपियन मुलगी आहे. प्रत्येक जण अफूयुद्ध व त्यातून घडणारे राजकारण यांनी या ना त्या पद्धतीने होरपळलेला आहे. हुबळीहून हे समुद्रयात्रेला निघतात तेव्हा पूर्णपणे भिन्न असलेले त्यांच्या पूर्वायुष्यातील बंध पुसून जातात व ते सहप्रवासी म्हणून जवळ येतात. सर्वांची एकच मनीषा असते - दूरवरच्या बेटावर जाऊन एक नवे आयुष्य सुरू करायचे. एका नव्या वंशाची सुरुवात!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘सी ऑफ पॉपीज’ ही कादंबरी आपल्याला गंगेकाठच्या अफूच्या शेतातून पुढे नेत चीनचे सुंदर रस्ते व उफाळणारा समुद्र असा विस्तारपूर्ण प्रवास घडवते. वसाहतवादी व साम्राज्यवादी प्रवृत्तीतून चीन व ब्रिटिश यांच्यात झालेले अफूचे युद्ध; व या युद्धाचा दाह, झळ बसलेल्या लोकांतून यातील पात्रे उभी राहिली आहे. त्यांच्या संवेदना, त्यांचे भौतिक \/ सांसारिक संबंध व त्यांच्याकडून होणारा प्रतिरोध यांमुळे ही कादंबरी जिवंत बनते. अमिताव घोष यांचे थोर कादंबरीकार म्हणून सामर्थ्य सिद्ध होते, ते यामुळे!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e\u003cb\u003eसन्मान : ‘मॅन बुकर’ ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी दोनदा नामांकन. ‘साहित्य अकादमी’ व आता घोषित झालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. याप्रमाणेच भारत सरकारने अमिताव घोष यांचा ‘पद्मश्री’ देऊन यापूर्वीच गौरवही केला आहे.\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642169565482,"sku":null,"price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SeaofPoppiesCover-500x500_716ade62-6642-47df-8b1e-ac0b21064c01.jpg?v=1732966815","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/sea-of-poppies-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-author-amitav-ghosh-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}