{"product_id":"shitti-शिट्टी-by-vandana-bhagvat","title":"Shitti शिट्टी by Vandana Bhagvat","description":"\u003cp\u003eनिरामय मानवी नातेसंबंधांची कल्पना करता येते? शोध चालूच आहे. अनेक पातळ्यांवरचे विरोधाभास सोसत वाटचाल चालू आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाटचाल चालू आहे अजूनही हे महत्त्वाचं नाही? इतके उत्पात सोसूनही शोध चालू आहे हे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिती नकार पचवले, किती वंचना आणि वर्चस्वांना नाकारले, संघर्ष केले आणि तरीही आपण निरामय नातेसंबंधांची भाषा बोलतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकमेकांच्या सोबत राहण्याच्या अनिवार्यतेला नाकारत-स्वीकारत आपण अजूनही आशा करतो की, मानवी नातेसंबंध सगळ्या दुःखातून मुक्त होतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी स्वतःच्या मर्यादांचा तिरस्कार करत तर कधी दुसर्यांोच्या,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्मृती-विस्मृतींना जोखत, परजत, पारखत, स्वीकारत चालत राहतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिखळ मैत्रीचे क्षण शोधण्याची आस मनात सांभाळत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिगत इतिहासावर या सगळ्याचे ताण जाणवत राहतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग लक्षात येतं की, संपूर्ण मानववंश-संस्कृतीची मीमांसा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या या शोधाच्या पाठीशी असायला लागेल,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिव्वळ एकट्या व्यक्तीचा इतिहास पुरेसा नसतो नातेसंबंधांच्या शोधात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहास, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण हे सगळे कारणीभूत असतात नात्यांच्या परिस्थितीला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेव्हा निरामय नातेसंबंधांची भ्रांतिका बनवण्यापेक्षा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसम्यक भानातून भविष्याकडे जाण्याची वाटचाल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअधिक खात्रीशीर...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641917514026,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/817f_360x_03e56138-8f91-4aa4-be19-c82bcd45a9ef.webp?v=1732963824","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/shitti-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-by-vandana-bhagvat","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}