{"product_id":"tappuchya-goshti-bhag-1-2-3-by-faruk-kazi-टप्पूच्या-गोष्टी-भाग-१-२-३-फारूक-काझी","title":"Tappuchya Goshti Bhag 1, 2, 3 by Faruk Kazi टप्पूच्या गोष्टी भाग १, २, ३ फारूक काझी","description":"\u003cp\u003eमी कोण?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी आहे टप्पू… ‘उडाणटप्पू’वाला टप्पू नाही काही… खराखुरा टप्पू ऊर्फ टप्या, टपक्या. माझं वय सहा. माझ्या घरचे मला मोठ्या शाळेत पाठवणार आहेत, कारण मला घरी ठेवणं त्यांना परवडणार नाय…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या घरात असते माझी आज्जी, बाबा, मम्मी आणि दिदाडी कार्टून’ म्हणजे माझी बहीण कोमल… मला की नाही, खूप खूप प्रश्न पडतात… म्हणजे बघा है…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपक्षी इतके उंच उडतात… मग ते बसतात का आभाळावर ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज्जीच्या काळातली भूतं आता कुठे असतील? ती माझ्या आणि दिदाडीपेक्षाही डेंजर असतील ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्गातल्या मुक्ताला बोलता आणि ऐकता का बरं येत नसेल? आणि मग तरीसुद्धा ती इतकी छान हसरी नि आनंदी कशी काय बरं राहत असेल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहिलीत गेलं म्हणजे काय सायकल यायलाच हवी काय? आणि नाय आली सायकल तर, काय घरी बसायचं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसं मेल्यावर कुठे जातात? दादा म्हणतो, मेल्यावर माणसं मनात राहतात… एवढी मोठी माणसं मनात कशी काय मावतात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा सगळ्या डेंजर प्रश्नांची उतरं शोधायला आणि आज्जीला विचारायला मला फार आवडतं. आणि मग त्याच्या गोष्टी बनवून सांगायला तर अजूनच आवडतं… तुम्हाला सांगू का मी माझ्या भारी भारी गोष्टी… माझ्या घरामधल्या, शाळेमधल्या, दोस्तांमधल्या आणि मनामधल्या ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगू म्हणता ? चला तर मग… वाचूयात ‘टप्पूच्या गोष्टी’…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकूण २१ कथा… तीन भागांत\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Faruq Kazi","offer_id":51014410010922,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TappuchyaGoshti1.jpg?v=1767338107","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tappuchya-goshti-bhag-1-2-3-by-faruk-kazi-%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-%e0%a5%a8-%e0%a5%a9-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}