{"product_id":"the-art-of-management-by-shiv-shivkumar","title":"THE ART OF MANAGEMENT by SHIV SHIVKUMAR","description":"\u003ch4\u003e\n\u003cstrong\u003eTHE ART OF MANAGEMENT\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eby\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/www.mehtapublishinghouse.com\/author\/SHIV-SHIVKUMAR.aspx\" target=\"_blank\"\u003eSHIV SHIVKUMAR\u003c\/a\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स`च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ‘प्रोफेशनल्स`चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स`कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49625487245610,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4060_474a2c97-bf50-48d9-969e-1e5b45a960e5.jpg?v=1732604478","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-art-of-management-by-shiv-shivkumar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}