{"product_id":"the-great-gatsby-द-ग्रेट-गॅटस्-बी-author-chandrashekhar-chingre-चंद्रशेखर-चिंगरे","title":"The Great Gatsby | द ग्रेट गॅटस्‌बी Author: Chandrashekhar Chingre|चंद्रशेखर चिंगरे","description":"\u003cp\u003e‘द ग्रेट गॅटस्‌बी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eह्या फिटझेरल्डच्या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट हॉलिवुडमध्ये नुकताच प्रदर्शित झाला असून\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘अमिताभ बच्चन’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांची त्यात भूमिका आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘द ग्रेट गॅटस्‌बी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eही फिटझेरल्डची अप्रतिम व सर्वश्रेष्ठ कादंबरी मानली जाते.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘जॅझ-युग’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नावाने ओळखल्या जाणार्‍या गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकांची प्रातिनिधिक कादंबरी म्हणूनही तिला आगळे महत्त्व आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतथापि त्या काळातील व्यक्तिमनाची व समाजाची भ्रांत अवस्था,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्वप्ने व वास्तव यांचे विदारक दर्शन आणि फिटझेरल्डची विलक्षण संवेदनक्षमता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्रतिभा आणि अवर्णनीय भावकाव्यात्मता यांकरताच ती अधिक महत्त्वाची आहे. जे गॅटस्‌बी ह्या अत्यंत धनाढ्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकर्तृत्ववान,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eशूर पण हळव्या मनाच्या तरुणाची ही शोकात्म प्रेमकहाणी आहे. पराकोटीचे नि:स्वार्थ प्रेम आणि निष्ठा ह्या मानवी सद्गुणांबरोबरच आत्यंतिक स्वार्थ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eक्रौर्य,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअज्ञान,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवासना आणि अनाकलनीय नियतीचे प्रहार यांचेही मन बधिर करून टाकणारे दर्शन ह्या कहाणीत घडते. कथा-निवेदन व बांधणीच्या दृष्टीनेही कादंबरी अतिशय कलात्मक आहे. विसाव्या शतकातील कादंबरी-वाङ्‌मयातील सर्वांत उल्लेखनीय व अभिजात कादंबर्‍यांपैकी एक म्हणून\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘द ग्रेट गॅटस्‌बी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरसिकमान्य आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642168123690,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Thegreatgatsby-500x500_a9bc7093-2db4-428e-8a2f-e9cef47054ae.jpg?v=1732966802","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-great-gatsby-%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a5%8d-%e0%a4%ac%e0%a5%80-author-chandrashekhar-chingre-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}