{"product_id":"the-mind-gym-mala-vel-havay-by-mind-gym","title":"THE MIND GYM MALA VEL HAVAY by MIND GYM","description":"\u003cp\u003eTHE MIND GYM MALA VEL HAVAY by MIND GYM\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane2\" class=\"tab-pane active\"\u003e‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या श्याम भुर्के अनुवादित पुस्तकाचा आशयच मुळात ‘`वेळ’ हा आहे. आपली कायम तक्रार असते, ‘वेळ पुरत नाही... वेळच नाही.. वेळ कसा काढू? इत्यादी इत्यादी. या नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा प्रकाश ‘द माइंड जिम – मला वेळ हवाय’ या पुस्तकाने टाकलाय. ‘आयुष्य हे फार लहान आहे’ असं आपण म्हणतो खरं; पण दोन हजार वर्षांनी आपलं आयुष्य तिप्पट होण्याची शक्यता आहे. तरीही वेळ कमी पडतो ही तक्रार आतासारखीच राहणार असं जे म्हटलं जातं त्यात प्रश्नही तेच आणि उत्तरही तेच राहणार असं दिसतंय; परंतु तसंच जगायचं नसेल तर, ‘द माइंड जिम’ चा मनाचा व्यायाम रोज करायलाच हवा. ‘आपल्याला चांगला आणि वाईट वेळ याची पाहणी करायची सवय लागल्यावरच भविष्यात आपण चांगले निर्णय घेऊ शकतो; परंतु त्यावर विचार करण्यात तासन्तास घालवू नये. आपल्याकडील वेळेची संपत्ती मोजण्याची साधनेही आहेत. आपण कदाचित ती वापरणार नाही; पण ती वापरल्यास पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपण वेळेचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करतोय हे कळेल.’ काही काळात आपण आपल्या वेळेच्या सवयी बदलू शकतो; परंतु त्या एका रात्रीत बदलणं अवघड आहे. ‘वेळ काढून वेळ सत्कारणी लावू!’\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49625486426410,"sku":null,"price":387.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4064_bf337259-b6a8-48f2-bef1-8098fb11172b.jpg?v=1732604468","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-mind-gym-mala-vel-havay-by-mind-gym","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}