{"product_id":"the-sense-of-an-ending-द-सेन्स-ऑफ-अ-ॅन्-एन्डिंग-author-julian-barnes-ज्यूलियन-बार्न्स","title":"The Sense of an Ending | द सेन्स ऑफ  अ‍ॅन् एन्डिंग Author: Julian Barnes । ज्यूलियन बार्न्स","description":"\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eमानवी जीवन, कथात्म साहित्याच्या एका आधुनिक सिद्धांतानुसार, जर घड्याळाच्या काट्याच्या टिक म्हणजे ‘प्रारंभ’ आणि टॉक म्हणजे ‘अंत’  या दरम्यानच फक्त घडत असेल, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर मग फ्रेंच विचारवंत लेखक आल्बेर काम्यूच्या “जीवनाचा खरा तात्त्विक प्रश्न म्हणजे आत्महत्या होय,”  या विधानाचा काय अर्थ असेल? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकदाचित काम्यूचे म्हणणे पटल्यामुळे केंब्रिज विद्यापीठातील एक तरुण बुद्धिमान तत्त्वज्ञ या कादंबरीत आत्महत्या करतो आणि त्यामुळे काळाच्या ओघात चार व्यक्तींच्या आयुष्यांना वेगळे पण अनाकलनीय अर्थ प्राप्त होतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा ‘एका अंताचा अन्वयार्थ’ लावीत पुढे जाताना ही कादंबरी काळ, स्मृती, इतिहास आणि नियती यांचे नवीन विश्लेषण समोर मांडते. जर कालप्रवाहाबरोबर स्मृतीही बदलत असेल \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर इतिहासाची व्याख्या अशीही होऊ शकते : \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“जेथे स्मृतींची अपूर्णता आणि पुराव्याचा अपुरेपणा मिळतो तेथे इतिहास लिहिला जातो.” \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी मनाच्या वैचारिक जाणिवा-नेणिवा इतक्या गुंतागुंतीच्या असतात की, जीवनाच्या शोकांतिकेचा अर्थ लावताना अखेर उरते फक्त संदिग्धता. खर्‍या अर्थाने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकविसाव्या शतकाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी ही ‘मॅन बुकर’ विजेती कादंबरी मराठी रसिक वाचकांनी वाचायलाच हवी.  \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003eTags:\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"http:\/\/www.padmagandha.com\/index.php?route=product\/search\u0026amp;tag=The%20Sense%20of%20an%20Ending%20%7C%20%E0%A4%A6%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%20%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%20%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%20%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97\"\u003eThe Sense of an Ending | द सेन्स अव्ह अ‍ॅन् एन्डिंग\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642167664938,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TheSenseofanEnding-500x500_5206f838-cba0-4fdf-8aa8-aba7f87641b8.jpg?v=1732966791","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-sense-of-an-ending-%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%85-%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8d-%e0%a4%8f%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-author-julian-barnes-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}