{"product_id":"thormothyanche-1001-suvichar-by-saket-prakashan-pvt-ltd","title":"Thormothyanche 1001 Suvichar (थोरामोठ्यांचे १००१ सुविचार)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमोठी माणसे कर्तृत्वाने मोठी असतातच; पण त्यांचे विचारही प्रेरणादायी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसतात. अनेक प्रसंगी आणि विविध विषयांवर या थोरामोठ्यांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्त केलेल्या आपल्या मतात इतका अर्थ दडलेला असतो की ही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमते प्रेरणा देतात. स्थळ, काळ आणि देश -भाषांच्या सीमा ओलांडून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमार्गदर्शन करणारे हे विचार सर्वव्यापी असतात. आपल्या जीवनाला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदिशा देण्यात या मौलिक सुविचारांची भूमिका महत्त्वाची असते. काय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरावे आणि काय करू नये, अशी गोंधळाची स्थिती निर्माण होते तेव्हा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे थोरामोठ्यांचे विचारच आपल्याला योग्य दिशा दाखवितात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात जगभरातील थोर बुद्धिवंत आणि विचारवंतांचे असेच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिवडक सुविचार ईश्वर, दान, दया, आनंद, परिश्रम, कला, चारित्र्य,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजीवन, ज्ञान, धर्म, धैर्य, नम्रता, पुस्तक, कीर्ती, प्रेम, भाग्य, मन,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमित्रता, विचार, चिंतन, संपदा, विश्वास, सुख, सौंदर्य, ध्येय इ.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविषयानुसार स्वतंत्र स्वरूपात संकलित केली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे जगभरातील\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eथोरामोठ्यांचे हे सुविचार सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त असा खजिना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Pratima Bhand \/ Saket Publication \/ Marathi","offer_id":45039430566186,"sku":null,"price":62.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Thoramothanche-1001-Suvichar-1-M.jpg?v=1685524505","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/thormothyanche-1001-suvichar-by-saket-prakashan-pvt-ltd","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}