{"product_id":"tukaram-ahiranit-nirupan-तुकाराम-अहिराणीत-निरूपण-by-dr-s-k-patil-डॉ-एस-के-पाटील","title":"Tukaram-Ahiranit Nirupan | तुकाराम – अहिराणीत निरूपण by Dr.S.K.Patil | डॉ.एस.के.पाटील","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. पाटील अहिराणी भाषा प्रदेशात अहिराणीतून अध्यात्मकथन, प्रवचन, अध्यात्मिक संवाद करीत असतात. खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर ‘ग्यानबा-तुकाराम’ ‘रामकृष्णहरि’ ‘जय हरि’ हा गजर होत आला आहे. महाराष्ट्र संस्कृती ही वारकरी संस्कृतीच होय. भजन, पूजन, किर्तन, नामजप, हरिनाम सप्ताह, वारी-दिंडी, एकादशी, अष्टगंध ही महाराष्ट्र संस्कृतीची प्रतिके आहेत आणि जीवनसाधना मार्गही आहेत. अनेक उत्सवांमध्ये वारकरी जीवनतत्वांचे आचरणही होत आले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eहे सारे लक्षात घेऊनच डॉ. एस. के. पाटील यांनी संतश्रेष्ठ तुकोबांचे अभंग येथे अहिराणीतून उलगडून दाखवले आहेत. तुकोबांची अभंगगाथा घरोघरी पोहचली आहेच, आजच्या आपल्या मराठी भाषकांच्या ओठी-पोटी सर्वाधिक पोहचलेले आहेत, ते तुकोबा. तुकोबा हे श्रवण-पठण, मनन, भजन, किर्तन या मार्गाने पिढ्यानुपिढ्या धडे देतात आणि सडेतोडपणे खडसावतातही आणि म्हणूनच डॉ. पाटील यांनी तुकोबांच्या अभंगांचे अहिराणीतून सार्थ कथन घडवलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअभंगाचे अहिराणीतले हे अर्थकथन प्रत्येक वाचकाला विचारप्रवृत्त करते, आपल्याला उद्देशूनच हे खडे अहिराणी बोल सुनावले आहेत असे वाटू लागते. लोकसंवादशैलीचा अप्रतिम कथनप्रयोग म्हणूनही हे लेखन परिणामकारक बनले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या बोलीतून तुकोबाच संवादी झाले आहेत, असे वाटू लागते आणि अध्यात्मही भक्तीसुलभ- अर्थसुलभ होऊन जाते. डॉ. एस. के. पाटील यांच्या अर्थविवरणाला ‘जय हरि’ म्हणत प्रतिसाद देणे आवश्यकच ठरले आहे. अहिराणीतले तुकोबा सर्वच भाषकांना नव्या अर्थप्रतीतीसाठी सिद्ध करीत आहेत, ही आजच्या काळातली सुंदर आणि चांगलीच गोष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626096894250,"sku":null,"price":473.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Untitled-1-450x695_a005a81a-7085-4bd6-be73-5671311bff92.jpg?v=1732613000","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tukaram-ahiranit-nirupan-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%a3-by-dr-s-k-patil-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}