{"product_id":"untitled-1sept_16-38","title":"Unstoppable By nick Vujicic..अनस्टॉपेबलनिक- वुईचिक","description":"\u003cp\u003eअनस्टॉपेबल याचा अर्थ संपूर्ण विश्वास असणं आणि साध्य करणं. तुमचा स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर व उद्दिष्टांवर भरवसा असतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमची ईश्वराच्या प्रेमावर व तुमच्या जीवनासाठी त्याने बनवलेल्या योजनेवर श्रद्धा असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगातले (लाखो) लोक निक वुईचिकचा प्रेरणादायी संदेश व त्याचा दुसरा चेहरा ओळखतात. जन्मतःच हात व पाय नसूनसुद्धा निकने अनेक साहसांचा आनंद लुटला, एक परिपूर्ण व सार्थ करिअर केलं आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासले. एक विशिष्ट व अद्वितीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपलं जीवन मौल्यवान असून ते इतरांसाठी देणगी आहे आणि आयुष्यात कितीही दुःखं व संकटं आली तरी ईश्वर सदैव आपल्यासोबत हजर असतो या वचनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून निकने सर्व समस्या व यातनांवर मात केली. अखंड विश्वासचं कृतीमध्ये रूपांतर होताना जी शक्ती प्रवाहित होते. त्याला निक आपल्या यशाचं श्रेय देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु हे सगळं घडतं कसं? अनस्टॉपेबल मधे निकने अशा समस्या व प्रतिकूल परिस्थितीचं वर्णन केलयं ज्यांना अनेक लोकांना आज सामोरं जावं लागतंय, उदा :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैयक्तिक संकटं, आत्मघातकी विचार, भावना व व्यसने, नातेसंबंधातील समस्या, दुसर्‍यांना त्रास देणे, निर्दयीपणा व सहनशीलतेचा अभाव, करिअर व नोकरीमधील आव्हानं, शरीर, मन, हृदय व आत्मा यांतील असंतुलन, आरोग्य व अपंगत्व याबद्दल चिंता, निमंत्रण \/ ताबा सुटल्याची भावना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःच्या आयुष्यातील घटनांमधून व इतर काही जणांच्या अनुभवावरून निक दाखवून देतो,की अनस्टॉपेबल बनण्यासाठी व ‘‘उत्तम जीवन’’ जगण्यासाठी या समस्यांना कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा. तुमच्या मार्गात कोणता अडथळा आहे? अनस्टॉपेबल बनण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिक वुईचिक प्रेरित करणारा वक्ता आहे, ख्रिश्चन धर्माचा प्रचारक आहे, लेखक व ‘लाइफ विदाउट लिम्ब्स’ या सेवाभावी संस्थेचा संचालक आहे. जगभरातील अनेकांसाठी तो प्रेरणास्थान बनला आहे व तो नेहमीच जनसमुदायाशी संवाद साधून त्यांना अडथळे दूर करण्याचा व स्वप्नं साकार करण्याचा संदेश देत आलाय. बरीच वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यावर निक आता आपली पत्नी कानाएबरोबर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तुम्ही त्याला पुढील वेबसाईटवर संपर्क करू शकता\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626156957994,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789390607181-768x1187_a7b6c974-5bbe-4498-8905-fd623597db41.png?v=1732614463","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-1sept_16-38","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}