{"product_id":"untitled-2sept_16-01","title":"BUDDHICHYA AAR PAAR CHAITANYA MAHAPRABHU","description":"\u003cp\u003eभक्तिभाव, बोध व आनंद यांचा अद्भुत संगम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eईश्वराला प्रसन्न करण्याचा, ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा मार्ग खूप कठीण आहे असे जेव्हा-जेव्हा धर्माच्या ठेकेदारांनी समाजात भ्रम पसरवला, तेव्हा-तेव्हा खुद्द ईश्वराने असे परिसासमान भक्त पृथ्वीवर पाठवले व त्यांनी त्यातील खोटेपणा सिद्ध केला. त्याचबरोबर सामान्य लोकांना भक्तीचा सहज व सोपा मार्ग दाखवला व स्वतःच्या सान्निध्याने त्यांना सोन्याप्रमाणे शुद्ध व निर्मळ भक्त बनवले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी संदेश दिला, “हसत-नाचत-गात, आनंदाने जीवन जगत, दैनंदिन कार्य करता-करता फक्त हरीचे नामस्मरण करत ईश्वरप्राप्ती होऊ शकते. त्यासाठी धर्माच्या किंवा ईश्वराच्या नावाखाली कोणत्याही फंदात पडण्याची अथवा कर्मकांडात गुरफटण्याची अजिबात गरज नाही. प्रेमाने ईश्वराचे नामस्मरण करताच तो तुमचा होईल.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचैतन्य महाप्रभू सखी भाव धारण करणारे असेच एक महान वैष्णव भक्त होते. त्यांनी मोठ-मोठी वेद-वाक्ये, अनुष्ठाने इत्यादींचे एका सरळ व साध्या मंत्रात परिवर्तन केले. त्यांचा मार्ग आजही लाखो-करोडो भक्त अनुसरत आहेत व आनंदाने भक्तीची अभिव्यक्ती करत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथाद्वारे आपण चैतन्य महाप्रभूंच्या या आनंदलीलेचे साक्षी बनून, भक्तीच्या विभिन्न अवस्था समजून घेणार आहात. त्यांच्या परिसासमान असलेल्या प्रभावामुळे आपण सोन्यासारखे भक्त होऊन भक्ती व आनंदाच्या वर्षावात चिंब भिजावे अशी शुभकामना देऊन हा ग्रंथ आपल्या सेवेत प्रस्तुत करत आहोत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626155876650,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789390607327_6fa0cd6e-4f7f-47b2-9635-98494ea31786.png?v=1732614407","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-2sept_16-01","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}