{"product_id":"untitled-4sept_12-25","title":"SAHASI JEEVAN KASA JAGAL – ASHAKYA KARYA SHAKYA KASA KARAL? By Sirshree","description":"\u003cp\u003e7 बहुमूल्य प्रश्नांची किमया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका शूरवीर योद्ध्याला अत्यंत कठीण असे सात प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला कधी घनदाट अरण्यात प्रवास करावा लागला;\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर कधी तप्त वाळवंटात पायपीट करावी लागली. कधी पर्वतांवर, डोंगरटेकड्यांवर चढावं लागलं; तर कधी अंधाऱ्या गुहेत ठेचकाळत शोध घ्यावा लागला. अखेरीस त्याला सात कठीण प्रश्नांची उत्तरं गवसली. कारण त्याच्याजवळ होती दोन शस्त्रं, ‘साहस’ आणि ‘योग्य समज’. त्या योद्ध्याचं नाव, ‘हातिम’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकहो, तुम्हालाही हातिमप्रमाणे शोधमोहीम हाती घ्यायची आहे. पण हे शोधकार्य तुम्हाला कोठे बाहेर करायचं नसून, ते तुमच्याच अंतर्यामी करायचं आहे. हातिमचा प्रवास तर अत्यंत खडतर होता; पण तुमची अंतर्यात्रा मात्र सुखद आणि सहज असणार आहे. कारण प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला जीवनरूपी प्रवासातील समस्यांचा, आव्हानांचा सामना करण्यासाठी एकूण चौदा सूत्रं लाभणार आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कथारूपातील पुस्तकाद्वारे जाणा-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* अशक्य कार्य शक्य कसं करावं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* यशप्राप्तीसाठी निसर्गाशी ताळमेळ कसा साधावा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* दुःखातून मुक्त होण्याचं नेमकं रहस्य काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* निःस्वार्थ जीवन जगल्यानं नेमकं काय प्राप्त होतं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* कर्मविज्ञान म्हणजे काय, कर्मबंधनांतून मुक्ती कशी मिळेल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, स्वास्थ्य आणि मधुर नातेसंबंध यांनी परिपूर्ण आयुष्य कसं जगावं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* जन्म-मृत्यूचं रहस्य काय?\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626151518506,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9788184155365_d8d8a59f-f647-4248-a4bc-83ca69de5aaa.png?v=1732614251","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-4sept_12-25","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}