{"product_id":"untitled-sep25_15-22","title":"Nokarshahiche rang नोकरशाईचे रंग\n\nज्ञानेश्वर मुळे","description":"\u003cp\u003eनोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत: समाजातूनच तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात. पण तरीही सामान्य जनतेला नोकरशाहीविषयी आपुलकी नाही आणि नोकरशाहीला सामान्य जनतेविषयी आस्था नाही. हे असे का बरे होत असावे ? नोकरशाही म्हणजे केवळ भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता एवढेच की काय ? आणि समाजाचेही काही चुकत नाही असे थोडेच आहे? मग काय केले तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या आशा-आकांक्षा साकार करून दाखविणारे प्रशासन तयार होईल ? दारिद्य, विषमता, विकासातला असमतोल दूर करता येईल? मंत्रालय, सचिवालय, विदेशातील भारतीय दूतावास येथे नेमके चालते तर काय ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत भारत सरकारच्या सल्लागारपासून प्रभारी राजदूतापर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे 'विश्वनागरिक' ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळूवार संवाद साधत आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49626136707370,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230925-160059_2598694c-74a9-42fb-bfcd-a79b5f460b29.jpg?v=1732613785","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-sep25_15-22","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}