{"product_id":"upyojit-marathi-उपयोजित-मराठी-author-santosh-shenai-संतोष-शेणई","title":"Upyojit Marathi| उपयोजित मराठी Author: Santosh Shenai |संतोष शेणई","description":"\u003cp\u003eएखादी भाषा केवळ राजभाषा बनली म्हणून ती समर्थ बनत नाही किंवा केवळ तिच्या अभिजाततेच्या दर्जानेही ती समर्थ ठरत नाही. कालौघात टिकून राहण्याची क्षमता तिच्यामध्ये तेव्हाच येईल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजेव्हा जनजीवनासाठी आवश्यक असणारे सर्व व्यवहार सहजी व सुरळीतपणे त्या भाषेत घडू लागतील. मग व्यवहारातील एखादे कार्य पुरे करण्यासाठी तिला परकीय भाषेच्या कुबड्या वापराव्या लागणार नाहीत. व्यवहारातील सर्व प्रकाराची कामे ही मातृभाषेत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआपल्या मराठीत तेवढ्याच समर्थपणे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअचूकपणे पार पडू शकतात ही जाणीव झाली तरच ती दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग होईल. प्रा. रा. ग. जाधव,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eडॉ. सु. रा. चुनेकर यांसारख्या भाषेच्या ज्येष्ठ जाणकारांनी आणि सुधीर गाडगीळ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंदीप खरे यांसारख्या मान्यावर व्यावसायिकांनी अधिकारवाणीने मराठीच्या व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोजनाविषयी या पुस्तकात मांडलेले विचार ही वाचकांसाठी नक्कीच पर्वणी ठरू शकते. या पुस्तकाद्वारे व्यावहारिक मराठीच्या अभ्यासकांना ही संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eप्राध्यापक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंशोधक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअभ्यासक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eव्यावसायिक हृा सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे हे संदर्भसाहित्य!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642181493034,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/UpyojitMarathi-500x500_0fd9785b-469f-4eb6-9a09-8245e44b8252.jpg?v=1732967089","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/upyojit-marathi-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-author-santosh-shenai-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b7-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a4%88","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}