{"product_id":"va-di-aani-santasaraswat-व-दि-आणि-संतसारस्वत-author-dr-jayant-vashta-डॉ-जयंत-वष्ट","title":"Va. Di. Aani Santasaraswat|व. दि. आणि संतसारस्वत Author: Dr. Jayant Vashta | डॉ. जयंत वष्ट","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसाररूप समग्र व. दि. कुलकर्णी - भाग – २\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी हे साहित्याचे अभ्यासक,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवाङ्‌मयाचे आस्वादक आणि संतसारस्वताचे उपासक होते. शांतपणाने व संयमाने पण निश्‍चित मते मांडण्याची त्यांची पद्धत होती. विषयाच्या अंतरंगात खोलवर उतरण्याची त्यांना सवय होती; आणि डोळस श्रद्धेने विवेचन करत शांतरसाचा आस्वाद घेणे व रसिकांना देणे ही त्यांची वृत्ती होती.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eप्रा. डॉ. व. दि. कुलकर्णी यांच्या जवळ जवळ सर्व ग्रंथाचा साररूपात परिचय करून देणारे डॉ. जयंत वष्ट यांचे ‘‘साहित्यविमर्शक आणि वाङ्‌मयास्वादक व. दि.’’ आणि\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘‘व. दि. आणि संतसारस्वत’’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे दोन ग्रंथ जणू वदिवाङ्‌मयाचे प्रस्तावना खंडच आहेत. अशा प्रकारे एखाद्या समीक्षकाचा समग्र साररूप परिचय करून देणारा हा बहुधा पहिलाच योग असावा. वदिंच्या श्रोत्यांना-वाचकांना आणि\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘मराठी’च्या अभ्यासकांसह रसिकांनाही हे एक अभ्यास-साधनग्रंथ ठरतील आणि ते त्यांच्या मूळ ग्रंथांकडे आकृष्ट होतील असे वाटते\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642185163050,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/VadiAaniSantsaraswat-500x500_a562f3a1-40ad-4b0f-86a4-048e76b03137.jpg?v=1732967166","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/va-di-aani-santasaraswat-%e0%a4%b5-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4-author-dr-jayant-vashta-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}