{"product_id":"vakatakkalin-vidarbha-prachin-vidarbhachya-itihasatil-suvarnakal-by-dr-minal-kherade-वाकाटककालीन-विदर्भ-प्राचीन-विदर्भाच्या-इतिहासातील-सुवर्णकाळ","title":"Vakatakkalin Vidarbha- Prachin Vidarbhachya Itihasatil Suvarnakal by Dr Minal Kherade वाकाटककालीन विदर्भ प्राचीन विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णकाळ","description":"\u003cspan\u003e\"प्राचीन भारताच्या ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास उत्तरेत इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान चंद्रगुप्त मौर्याने प्रथमत: केंद्रशासीत राज्यव्यवस्था निर्माण केली. सम्राट अशोकाच्या सोपारा स्तंभलेखावरून दक्षिणेत मौर्य साम्राज्याच्या सीमा म्हैसूरपर्यंत विस्तारलेल्या असल्याचे स्पष्ट होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर धर्म प्रचारार्थ पाठविलेल्या स्ववीरांच्या नोंदी पाचव्या व तेराव्या शिलासनात आहेत. त्यात असलेले भोज, पेतनिक, रठिक, अपरांत इत्यादी उल्लेख; दक्षिण पंथाशी संबंधीत आहेत. त्यातील भोज राज्य म्हणजे ‘विदर्भ’ होय.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eप्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल असा हा कालखंड आहे. ‘वाकाटक’ घराण्याचा शासनकाळ साधारणत: इसवी सन २५० ते ५५० मानला जातो. या तीनशे वर्षाच्या काळात विदर्भाला वाकाटकांनी समृद्धी आणली. वाकाटक राजे पराक्रमी व ऐश्वर्यसंपन्न होते. तसेच ते प्रजाहितदक्ष, धर्मसहिष्णू, कला व स्थापत्याचे भोक्ते होते. हा कालखंड; राजकीयदृष्ट्या समृद्ध व आपला ठसा उमटविणारा कालखंड होता. विदर्भाला वाकाटक घराण्याच्या विविध राजांनी वैभव प्राप्त करून दिले. वाकाटकांच्या प्रबळ सत्तेने उत्तर आणि दक्षिण भारतावरही प्रभाव टाकला.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eअशा या प्राचीन भारतीय इतिहासातील या काहीशा दुर्लक्षित परंतु महत्वाच्या कालखंडाची ओळख करून देणारे हे पुस्तक जिज्ञासू वाचकांबरोबर इतिहास अभ्यासकही अवश्य पसंत करतील असा विश्वास वाटतो. \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641893724458,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vakatakkalin_Vidarbh.jpg?v=1758196263","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vakatakkalin-vidarbha-prachin-vidarbhachya-itihasatil-suvarnakal-by-dr-minal-kherade-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}