{"product_id":"vedana-te-chetana-वेदना-ते-चेतना-by-pra-dr-sunanda-revase-प्रा-डॉ-सुनंदा-रेवसे","title":"Vedana Te Chetana | वेदना ते चेतना by Pra.Dr.Sunanda Revase | प्रा.डॉ.सुनंदा रेवसे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘वेदना ते चेतना’ या ग्रंथामध्ये लेखिकेने ज्या ज्या व्यक्तिमत्वांचा आढावा घेतला तो अत्यंत चिकित्सक, मुद्देसूद आणि व्यासंगीपणाने घेतलेला आहे. एखाद्या चरित्राची अत्यंत मोजक्या शब्दांत मांडणी करणे तितके सोपे नाही; मात्र ते कौशल्य लेखिकेने अचूक परिमाणात टिपलं आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएखाद्या व्यक्तिच्या जीवनातून बोध घेता येऊ शकतो. शोध मात्र स्वतःच घ्यावा लागतो. तो प्रस्तुत ग्रंथात लेखिकेने घेतलेला आहे. वेदना जोपासणे सर्वांनाच जमू शकत नाही. आगीला कवटाळणे, वादळाला सामोरे जाणे, सागराला कवेत घेणे आसान काम नाही. त्यासाठी ‘ममत्व’ हरवून बसावं लागते. सुखाचे दान करावे लागते. ज्याला हे जमते तो ‘महात्मा’ पदाच्या जवळ पोहोचतो. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eवेदनेतील आनंद मिळवण्यासाठी संवेदना सतत चेतवावी लागते. ती जागृत ठेवली तरच वेदनेचे अमरत्व अबाधित राहील हा समतोल लेखिकेने संयमितपणे सांभाळला याचा मनस्वी आनंद वाटतो. लेखिकेने सिद्ध केलं की ‘वेदना’ ह्या मोरपिसासारख्या नसून त्याअग्निफुलांप्रमाणे असतात. त्यासाठी त्यांनी वेदनेचा दीप हातात घेणाऱ्यांची नामावली दिली आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनात्याला नाव कोणतेही असो पण तरीही नात्याच्या पलिकडे एक नाते असते व ते होय मानवतेचे मानवतेच्या नात्याने माणूस माणसासारखा वागला तरच मानवी जीवनमूल्यांना अमरत्व प्राप्त होईल. तेव्हाच मानवतेचं वस्त्र विणल्या जाईल. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलहानथोरांना, विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितच उपयोगाचा आहे. प्रत्येकाने हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावा इतके त्याचे मोलनिश्चितच आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलेखिकेच्या उत्तरोत्तर लेखनकार्याला माझ्या भरभरून शुभेच्छा आणि \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअभिनंदन ! \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e– डॉ. मंगला वि. कविश्वर\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्राचार्य, होमिओपॅथी महाविद्यालय,\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eखामगाव\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626094141738,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Untitled-5-5-450x695_64f6118f-ca4a-4577-93af-3f6be75101ac.jpg?v=1732612982","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vedana-te-chetana-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%be-by-pra-dr-sunanda-revase-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}