{"product_id":"vegali-by-ayfer-tunc-lalita-kolharkar-वेगळी-आयफर-टंक-भाषांतर-ललिता-कोल्हारकर","title":"Vegali by Ayfer Tunc Lalita Kolharkar वेगळी - आयफर टंक - भाषांतर : ललिता कोल्हारकर","description":"\u003cp\u003eवेगळी \/ आयफर टंक \/ भाषांतर : ललिता कोल्हारकर Vegali \/ Ayfer Tunç \/ Tr. : Lalita Kolharkar\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘वेगळी’ ही एका प्रौढ वयाकडे झुकत असलेल्या तुर्की स्त्रीची अंतर्मुख करणारी कथा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या वयाच्या चाळीसाव्या वाढदिवशी ती अर्जेंटिनातील ‘उशुआईआ’ — जगाच्या अंतिम टोकावरचे शहर — इथे जाण्याचा निर्णय घेते.. एकाएकी.. आणि तिथे जातेही. इस्तंबूल ते उशुआईआ… याआधी साधा बसचाही प्रवास फारसा न केलेली अशी ती; पण एके दिवशी पूर्ण तयारीनिशी आपली सूटकेस उचलते, अवघा विमानप्रवास करून उशुआईआला पोहोचते, मुक्कामाची जागा आणि स्वतःच्या उदरनिर्वाहापुरतं काम मिळवते आणि.. तिच्या अनपेक्षित निर्णयांसारखं कोविड-१९ या अनपेक्षित महामारीमुळे अख्खं जग थांबतं आणि तिने आखलेल्या पुढल्या प्रवासाचा बेतही स्थगित होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिचा सभोवताल जरी आता या महामारीच्या विळख्यात घेरलेला असला; तरी तिच्या अंतर्गत तिच्या भूतकाळाचा प्रवास मात्र सुरू होतो. लहान-लहान, पण आखीव प्रकरणांतून तिच्या आयुष्याची चाळीस वर्षे आपल्यासमोर उलगडत जातात — वेळेच्या सरळ रेषेत नाही, तर आठवणींच्या तुटक, तरंगत्या प्रवाहात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही नायिका निनावी आणि तिच्या आयुष्यातील पात्रेही निनावीच. अपवाद केवळ मिगेलचा!.. तिचा हा निनावी भवताल सुरुवातीला एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या भावविश्वासारखाच भासत असला, तरी तिच्या मनात दडलेली जिज्ञासा, तिने न बोलता केलेला प्रतिकार आणि जगाकडे पाहण्याची तिची स्वतंत्र दृष्टी हळूहळू तिला तिची खास ओळख देतात..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिच्या चाळीस वर्षांचं तिने व्यतीत केलेलं आयुष्य वाचताना एक गोष्ट मात्र वाचकांच्या मनात कोरली जाते — ती ‘वेगळी’ आहे.. वेगळीच आहे…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eवेगळी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखिका : आयफर टंक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाषांतर : ललिता कोल्हारकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Popular Prakashan \/ Ayfer Tunç","offer_id":52927027904810,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_6e6ee2f8-f8b0-4606-b17a-5f95abf6f551.jpg?v=1791882813","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vegali-by-ayfer-tunc-lalita-kolharkar-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%9f%e0%a4%82%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}