{"product_id":"vhalam-by-mahadev-more-व्हलम","title":"Vhalam By Mahadev More व्हलम","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवीरपाक्ष चौगुले हा एक ड्रायव्हर आणि गाड्यांचा मालकही. कुटुंबापासून दुरावलेला, बायकोला काडीमोड दिलेला. वेश्यावस्तीचे उंबरठे झिजवणारा. एका नाट्यमय प्रसंगातून त्याच्या जीवनात प्रवेशलेल्या सुलाशी तो लग्न करतो. सुलाला दिवसही जातात; सुलाला वाचवताना वीरपाक्षकडून अभावितपणे एक आणि सुलाकडून नाईलाजास्तव एक खून होतो; पण ते खून पचतात. वीरपाक्ष ट्रकच्या धंद्यात उडी घेतो, त्यासाठी तो त्याच्या सगळ्या गाड्या विकून टाकतो. त्याच वेळी सुला बाळंत होऊन तिला मुलगा होतो; पण ती दगावते. या प्रसंगामुळे ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचा पहिला हप्ताही त्या वेळेला चुकता झालेला नसतो. त्याचे आई-वडील, त्याची पहिली बायको पुन्हा त्याच्या जवळ येतात; पण ट्रकला आग लागून ट्रक जळून जातो. वीरपाक्षच्या जीवनाची गाडी परत एकदा पहिल्याच वळणावर त्याला घेऊन येते. एका ड्रायव्हरची जीवनकहाणी. या जीवनकहाणीतून ड्रायव्हिंगच्या व्यवसायातील अनुभवही उलगडत जातात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Mahadev More","offer_id":52373447377194,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/VHALAMbyMAHADEVMORE_87032f83-a53e-42dc-9f67-dc2b5b1e2db3.jpg?v=1787721606","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vhalam-by-mahadev-more-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a4%ae","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}