{"product_id":"vithaichi-kanhaai-विठाईची-कान्हाई-by-aarti-kale","title":"Vithaichi Kanhaai विठाईची कान्हाई by Aarti kale","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e ‘विठाईची कान्हाई’ ही संत कान्होपात्रा यांच्या जीवनावरची कादंबरी आहे. संत कान्होपात्रा ही वारकरी संतांमधील सोनचाफ्याचे फूल आहे. ती शामा गणिकेची मुलगी असून अत्यंत सौंदर्यवती, नृत्यनिपुण व मधुर आवाज असणारी होती. तिच्या सौंदर्याची, नृत्याची, आवाजाची ख्याती दूरवर पसरली होती; पण ती मात्र विठ्ठलभक्तीत तल्लीन होती. पांडुरंगाशी तिची एकनिष्ठता, भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, बिदरचा राजा तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला पकडून आणण्यासाठी सरदार पाठवतो; पण ती शेवटचे दर्शन घ्यायला विठ्ठल मंदिरात जाते व आपला देह विठ्ठलचरणी समर्पित करते. मृत्यूलासुद्धा आपल्या इच्छेने, भक्तीने अधीन करून घेणारी कान्होपात्रा एक श्रेष्ठ भक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसौ. आरती काळे यांच्या ‘विठाईची कान्हाई’ या कादंबरीत कान्होपात्रेच्या आयुष्यातील उत्कट भक्तीचा, विरक्तीचा प्रत्यय येतो. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील संघर्ष, गणिकेचे जीवन, तत्कालीन समाज व संस्कृती यांचे दर्शन घडते. कान्होपात्रा गणिका व सुंदर असल्याने तिच्या वाट्याला येणारे दुख, एक स्त्री म्हणून तिच्या वेदना, यातना आपल्याला जाणवतात; पण तिची भक्ती, एकनिष्ठता पाहून मन विस्मित होते, तिचा हा उत्कट प्रवास लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत, अर्थपूर्ण संवादात व रसाळ भाषेत फार भावपूर्णरीत्या रेखाटला आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625703088426,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vitthaechi_Kanhai_Book_Cover_F-300x463_b9550c5e-e9fc-452f-8c0a-77cea6490a90.jpg?v=1732609613","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/vithaichi-kanhaai-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%88-by-aarti-kale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}