{"product_id":"yashasvi-vyavsthapanaci-gurukilli-k-n-raghavan-शस्वी-व्यवस्थापनाची-गुरुकिल्ली","title":"Yashasvi Vyavsthapanaci Gurukilli  K.N. Raghavan शस्वी व्यवस्थापनाची गुरुकिल्ली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजेव्हा बाकीचे लोक मागे पडतात, तेव्हा काही व्यवस्थापक आपले काम सहजपणे आणि उत्साहाने कसे करू शकतात? रामायण हे आपल्या भूमीतील दोन महाकाव्यांपैकी एक म्हणून नावाजले जाते. सार्वत्रिकरीत्या हा एक धार्मिक ग्रंथ असल्याचे मानले जाते; कारण त्यात प्रभू रामाच्या जीवनाचे चित्रण केले आहे. तथापि, या ग्रंथाचे बारकाईने वाचन केल्यास, प्रभू रामाचा एक नेता म्हणून असलेला मोठेपणा समोर येतो; ज्याने आत्मसाक्षात्काराच्या पलीकडे जाऊन आत्म-उत्कृष्टतेची पातळी गाठली. हे महाकाव्य आपल्याला भरत, लक्ष्मण, हनुमान, बिभीषण, जटायू, संपाती अशा अनेकांच्या; तसेच सीता, मंदोदरी, तारा अशा विविध स्त्रीपात्रांच्याही कथा सांगते. त्यांच्यापैकी प्रत्येक जण काही ना काही संदेश देतो, जो आधुनिक जगातही आव्हाने हाताळायला आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला उपयुक्त ठरतो. रामायण व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण धडे देण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण आणि जतनासंबंधीही संदेश देते, जे समकालीनदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाने रामायणातून आजही महत्त्वपूर्ण असलेले जीवन संदेश कौशल्याने शोधून काढले आहेत आणि ते एका रंजक कथनाच्या स्वरूपात मांडले आहेत. वैयक्तिक आनंद, व्यावसायिक यश आणि पर्यावरणात्मक शाश्वतता यांची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishawakarama Publication \/ K.N. Raghavan","offer_id":51208036909354,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Mantras-Book-Cover-Marathi_F-300x464.jpg?v=1772601080","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/yashasvi-vyavsthapanaci-gurukilli-k-n-raghavan-%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}