{"product_id":"yogi-by-baba-bhand-योगी","title":"Yogi by Baba Bhand योगी","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003ctable width=\"555\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"555\"\u003e“श्री कृष्णा महाराजांनी स्वतःची चिता रचून\u003cbr\u003eअग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी ५०१ वा\u003cbr\u003e‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं\u003cbr\u003eजीवनकार्य संपलं… देवानं मला बोलावलं….’ आणि ते\u003cbr\u003eनिघून गेले.\u003cbr\u003eआजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही\u003cbr\u003eघटना आहे. एक पंचविशीतला तरुण जेमतेम दहावी\u003cbr\u003eशिकलेला, कोणताही मानवी गुरू न लाभलेला, अभंग\u003cbr\u003eलिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे.\u003cbr\u003eकृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा प्रवाह विस्तारित करणारे आहेत. खरं बोलणं\u003cbr\u003eआणि वागणं म्हणजे ईश्वराकडं जाणं. लोभ, अहंकार, राग या शत्रूंपासून दूर राहा. गरिबांना लुबाडणाऱ्या ढोंगी बुवा-साधूंपासून सावध व्हा. कर्मकांडात अडकू नका.\u003cbr\u003eश्रम हीच ईश्वरसेवा समजा, हे सगळं ते सांगतात. सामान्य माणसाचं जगणं\u003cbr\u003eआनंददायी व्हावं, हे त्यांच्या अभंगाचं सूत्र आहे.”\u003cbr\u003e“भाविकाचे साधकात रूपांतरण प्रक्रिया दाखविणारी ही कादंबरी विश्वसनीयता\u003cbr\u003eसंभाव्यतेच्या अनेकपदरी इंद्रधनूचे संस्मरण देते. आधुनिक जीवनरहाटीतही\u003cbr\u003eआध्यात्मिक वाटचालीचे महत्त्व अधोरेखित करते, भावानुभूतींशी समरसता निर्माण\u003cbr\u003eकरते. लोककथांचे, मिथककथांचे सारे सामर्थ्य स्वीकारून श्री कृष्णा महाराजांच्या\u003cbr\u003eआंतरिक भाव-आंदोलनांना हळुवारपणे आणि श्रद्धेने सादर करते.\u003cbr\u003e‘लौकिक आणि अलौकिक, वास्तव आणि कल्पित, इंद्रियगम्य आणि अतिंद्रिय\u003cbr\u003eअनुभूतींच्या सीमारेषांचे अभूतपूर्व संमिश्रण साधणाऱ्या विविध कथनप्रणालींनी\u003cbr\u003eआणि कथनदृष्टिकोनांनी श्री कृष्णा महाराजांच्या लीळांना एका सुंदर-सुबोध\u003cbr\u003eकलाकृतीचे रूप येथे प्राप्त झाले आहे.”\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641932226858,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FinalDesignE-Book-54-340x520_a22c7bee-516d-4cb1-90ae-bdcc21cd0a26.jpg?v=1732963924","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/yogi-by-baba-bhand-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}