{"product_id":"zambal-ghandaat-mansancha-bhavwishva-ulgadnarya-katha-sameer-gaikawad-झांबळ-घनदाट-माणसांचं-भावविश्व-उलगडणाऱ्या-कथा-समीर-गायकवाड-in","title":"Zambal : Ghandaat Mansancha Bhavwishva Ulgadnarya Katha   | Sameer Gaikawad झांबळ : घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथा  |  । समीर गायकवाड IN","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eभेटलेली माणसे घनदाट होती !\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eथेट पोचायास कोठे वाट होती ?\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ह्या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eयाच तोलामोलाची माणसं या कथांत भेटतील. ही माणसं अनेकार्थांनी घनदाट होती.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता,\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eयाबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या थेट वाटा उरत नाहीत, उरतो तो पश्चाताप!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअशाच काही साध्यासुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टींचे हे पुस्तक. \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49626160562474,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Zambal.jpg?v=1754575627","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/zambal-ghandaat-mansancha-bhavwishva-ulgadnarya-katha-sameer-gaikawad-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b3-%e0%a4%98%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1-in","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}