Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Manat By Achyut Godbole मनात अच्युत गोडबोले
Rs. 719.00Rs. 799.00

Manat By Achyut Godbole मनात अच्युत गोडबोले

हे पुस्तक एखाद्या गोष्टीसारखं लिहिलंय. त्यामुळे हे ऐतिहासिक क्रमानं लिहिण्याचा यात प्रयत्न केलाय.

यामध्ये फ्रॉईडचं मनोविश्लेषण, वर्तनवाद (बिहेवियरिझम), समष्टिवाद (गेस्टाल्ट),
मानवतावादी (ह्युमॅनिस्टिक) अशी मानसशास्त्रातल्या विचारप्रणालींचीही (स्कूल्स ऑफ सायकॉलॉजी) सखोल चर्चा आहे.

त्याचप्रमाणे मानसशास्त्राच्या प्रायोगिक (एक्स्पेरिमेंटल), डेव्हलपमेंटल, सामाजिक (सोशल), कॉग्निटिव्ह, पर्सेप्शन, अपसामान्य मानसशास्त्र, मनोविकार आणि मानसोपचार या शाखांचंही खोलवर विवेचन आहे.

तसंच बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व आणि भावना-प्रेरणा या विविध मानसिक संकल्पना
आणि प्रतिक्रियांविषयीही बरीच चर्चा केलीय.

फक्त हे सगळं ‘मानसशास्त्रातल्या विचारसरणी‌’, ‘मानसशास्त्रातल्या शाखा‌’ आणि ‘विविध मानसिक संकल्पना आणि प्रक्रिया‌’ अशा शीर्षकाखाली सादर न करता ऐतिहासिक क्रमानं सादर केल्या आहेत एवढंच; पण ज्याला याच क्रमानं वाचायचं आहे तो या पद्धतीनं आणि क्रमानं हे पुस्तक वाचू शकतो.

ऑटिझम, स्क्रिझोफ्रेनिया, नैराश्य (डिप्रेशन), भयगंड (फोबियाज), ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर), चिंता/ताणतणाव अशा तऱ्हेचे अनेक मनोविकार आज जगामधल्या कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करताहेत.

हे मनोविकार का होतात, ते पहिल्यांदा केव्हा लक्षात आले, त्यांच्यावर संशोधन कसं झालं, त्यात अडचणी काय आल्या, त्यावर औषधं कशी निघाली, या सगळ्या प्रवासाचा इतिहास खूपच रोमहर्षक होता. त्याचाही आढावा या पुस्तकात घेतला आहे.

Translation missing: en.general.search.loading