Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 383.00Rs. 425.00
'शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे.' - डॉ. विठ्ठल लहाने सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन 'मानवी शरीरप्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे. यातून सर्वसामान्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांचे निरसन होईल.' - डॉ. अविनाश सुपे डीन केईएम हॉस्पिटल 'शरीर हे पुस्तक वाचणं म्हणजे शरीरविज्ञानाच्या क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणणारा आणि मनाला उल्हासित करणाऱ्या तरल सिंफनीसारखाच अनुभव आहे.' डॉ. नंदकुमार सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ 'अत्युत्कृष्ट! हे पुस्तक वाचताना आपण हे प्रत्येक अवयवसंस्थेच्या आत जाऊन प्रत्यक्ष अनुभवतोय, असंच वाटत राहतं.' - डॉ. विवेक नळगिरकर 'प्रत्येकानं 'शरीर' हे अद्भुतरम्य पुस्तक वाचणे आणि संग्रही ठेवणे अगत्याचे आहे, या पुस्तकामुळे आपल्याला आपल्यातल्या अणुरेणूला ओळखण्यासाठी मोलाची साथ लाभणार आहे.' - डॉ अनिल गांधी सुप्रसिद्ध सर्जन 'ग्रामीण भागातून मेडिकलचं शिक्षण घ्यायला येणाऱ्या आणि इतरही सगळ्याच विद्यार्थ्यांना शरीरक्रियाशास्त्र हा विषय समजण्यासाठी 'शरीर' हे पुस्तक खूपच मदत करेल असं मला वाटतं.' - डॉ. अजित भागवत सुप्रसिद्ध हृदयक्रियातज्ज्ञ 'जनांसाठी असलेलं हे 'शरीर' इतिहास आणि शरीरविज्ञान यांची गुंफण करून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो.' - डॉ. शंतनू अभ्यंकर
Translation missing: en.general.search.loading