Your cart is empty now.
अच्युत गोडबोले, दीपा देशमुख लिखित ‘तंत्रज्ञ जीनियस’ पुस्तकांच्या या तीन संचात दिव्याचा शोध लावणारा थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला, टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल, विमानाचा शोध लावणारे राईट बंधू, रेडिओचा शोध लावणारा गुग्लिएल्मो मार्कोनी, टेलिव्हीजनचा शोधकर्ता जॉन लॉगी बेअर्ड, आधुनिक संगणकाचा जनक अॅलन ट्यूरिंग, अॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्ज, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स, अॅमेझॉनचा जेफ बेझॉस, गुगलचे सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज आणि फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आपल्याला भेटणार आहेत.
तंत्रज्ञानामुळे आपलं जग जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे बदलून गेलं आणि आपलं जगणं उजळून गेलं. दिवे, टेलिफोन, विमान, रेडिओ, टेलिव्हिजन, कम्प्युटर्स या सगळ्या साधनसुविधा आणि संपर्क/संवाद यामुळे जग आणखी जवळ आलं. या सगळ्यांचं श्रेय आहे ते या जग बदलणार्या 12 तंत्रज्ञ जीनियसना! ‘तंत्रज्ञ जीनियस’ या पुस्तकांत तंत्रज्ञांची वादळी आयुष्यं, त्यांचा संघर्ष, त्यांचे शोध हे सगळं काही रंजक अिाण रसाळ भाषेत एखाद्या गोष्टीसारखं कुठल्याही वयोगटातल्या कुतूहल बाळगणार्या वाचकांना वाचायला आवडेल.
अच्युत गोडबोले हे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व असून विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, संगणक, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य, चित्रकला आणि संगीत अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी चौफेर मुशाफिरी केली असून या सगळ्या विषयांवर साहित्यक्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान मौलिक आहे.
दीपा देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं असून त्या एक संवेदनशील लेखिका आहेत. व्यक्तिचित्रण, रिर्पोताज प्रकारातलं लिखाण करण्यात त्यांची हातोटी विलक्षण असून विज्ञान, कला, संगीत आणि आता तंत्रज्ञान या क्षेत्रातलं त्यांनी केलेलं लिखाण वाचकांना खिळवून ठेवणारं आहे. तंत्रज्ञ जीनियसचे लेखकद्वयी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांची सर्वच पुस्तकं अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहेत. तसंच ‘जीनियस’ ही मालिका अतिशय प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अभ्यासपूर्ण असून अतिशय सोप्या, सुंदर भाषेतली ही मालिका मराठी साहित्यात अनमोल भर घालणारी आहे.
Added to cart successfully!