Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Paul Gauguin Ek Kalandar Kalakar by Dr. Madhavi Mehendale पॉल गोगँ एक कलंदर कलाकार  माधवी मेहेंदळे
Rs. 450.00Rs. 500.00

Paul Gauguin Ek Kalandar Kalakar by Dr. Madhavi Mehendale पॉल गोगँ एक कलंदर कलाकार  माधवी मेहेंदळे

मॉडर्न आर्टचा जनक पॉल गोगँ…. एक जगप्रसिद्ध प्रतिभावान कलाकार….. सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्लाइझोजिनम अशा चित्रकलेतील विविध शैली त्याने विकसित केल्या आहेत. चित्रकलेसोबतच त्याने शिल्पकला (Sculpture), काष्ठशिल्प (Woodcraft), सिरॅमिक या माध्यमांतूनही त्याने प्रचंड निर्मिती केली आहे. अनेक समकालीन चित्रकारांमध्ये गोगँने स्वतःची वैशिष्ट्यं राखली आणि एवढंच नव्हे तर, पिकासोसारख्या कलाकारावरही गोगँच्या चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो.

या पुस्तकात लेखिका डॉ. माधवी मेहेंदळे यांनी गोगँच्या एकंदर कलाप्रवासाचा आणि कलावैशिष्ट्यांचा मागोवा घेतला आहे. त्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. कलाविश्वातील त्याच्या मुशाफिरीसोबतच पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, नातेसंबंधांचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्वी स्वभावाचाही धांडोळा घेतला आहे. ताहिती बेटावरील वास्तव्य हा गोगँच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय… त्याचेही तपशील पुस्तकात सापडतील.

पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गोगँच्या कलावैशिष्ट्यांची वाचकांना प्रचिती यावी यासाठी पुस्तकात अनेक तपशिलांसह समाविष्ट केलेली रंगीत चित्रं. चित्रकलेच्या इतिहासात ‘माइल स्टोन’ ठरलेल्या कलाकाराचा सर्वांगीण धांडोळा घेणारं पुस्तक पॉल गोगँ : एक कलंदर कलाकार

Translation missing: en.general.search.loading