Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ramban Amrutras (रामबाण अमृतरस)  by Dr. Suresh Nagarsekar / Dr. Amita Nagarsekar
Rs. 45.00Rs. 50.00
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात गरीब आणि सामान्य
माणसासाठी आरोग्यसेवा आज महाग झाली आहे. अशा वेळी प्राचीन ज्ञानाचा
वारसा लाभलेली, अल्पमोली बहुगुणी रामबाणासारखी प्रभावी ठरणारी
औषधे, त्यांची माहिती समाजाची गरज ठरणार आहे. साध्या आणि सोप्या
घरगुती उपायांनी स्वतःचे रोगनिवारण करण्याचे प्रशिक्षण स्वतः घेणे म्हणजे
आरोग्यशिक्षणच होय.
भारत ही अनेक औषधांची खाण आहे. ही सगळी नैसर्गिक औषधे आज
सर्वत्र उपलब्ध आहेत. अशा तीन औषधांचे मिश्रण म्हणजे अमृतरस. हे
अमृतासमान गुणकारी ठरणारे औषध कापूर, पुदिना आणि ओवा या तीन
वनौषधींपासून बनविले आहे. हे आपल्या घरात अनेक आजारांवर उपयुक्त
आहे. ते आयुर्वेदिक दुकानातही उपलब्ध होऊ शकते, तसेच घरच्याघरीही
बनविता येते. ते बनवण्याची रीत, त्याचे उपयोग लेखकांनी इथं विस्ताराने
दिले आहेत. त्याचबरोबर दालचिनी आणि निलगिरी तेलाचा औषधी
उपयोगही दिला आहे.
अडाण्यालाही शहाणे करण्याचे आरोग्यसेवेचे व्रत घेतलेल्या विख्यात डॉ. सुरेश
नगर्सेकर आणि डॉ. अमिता नगर्सेकर यांचे ‘रामबाण अमृतरस’ हे पुस्तक
म्हणजे अनेक रोगांवरचे एकमेव औषध आहे. प्रत्येकाने स्वतः अनुभव घेऊन
खात्री करावी, असा त्यांचा आग्रहाचा संदेश आहे.
Translation missing: en.general.search.loading