Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Vapu 85 By V P Kale
Rs. 450.00Rs. 500.00
ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो. ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.
या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, “सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे. याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.
Translation missing: en.general.search.loading