मन, शरीर आणि जिगर १५ जुलै, २००७. लुईस गॉर्डन पग उत्तर धु्रवावरील समुद्रात बर्फावर उभा होता. त्याच्या अंगावर फक्त गॉगल्स आणि ‘स्पीडो’ म्हणजे पोहण्याची चड्डी होती. ज्या पाण्यात तो उडी मारण्याच्या तयारीत होता, त्या पाण्याचे तापमान होते उणे १.७०से. जगातील सर्वांत थंड पाण्यात मारली जाणारी ही एक ‘डुबकी’ नव्हती. त्याचा त्या पाण्यात एक कि.मी. अंतर पोहून जायचा इरादा होता. हे साहस म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण होते.
.