Your cart is empty now.
पण जो कोणी रेखाटतो, तो चित्रच रेखाटतो. जीवनात बाहेरच्या बाजूस घटनांचा क्रम चाललेला असतो आणि आतल्या बाजूस त्याच्या जोडीजोडीनं चित्र काढणं चाललेलं असतं. या दोन्हींचा एकमेकांशी संबंध असतो; पण दोन्ही गोष्टी एकच नसतात. काही वर्षांपूर्वी एक दिवस कुणी तरी मला माझ्या आयुष्यातल्या घटनांसंबंधी विचारलं होतं. तेव्हा मी या चित्रांच्या खोलीत माहिती काढायला गेलो होतो. वाटलं होतं, जीवनवृत्तांतासंबंधी त्यातल्या दोन-चार मोठ्या-मोठ्या घटना काढून पाहिल्या, की काम होईल. पण दार उघडल्यावर दिसलं, जीवनातल्या स्मृती म्हणजे जीवनाचा इतिहास नसतो - ती कोण्या एका अदृश्य चित्रकारानं स्वत: केलेली रचना असते. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे रंग लावलेले असतात, ते बाहेरच्या रंगांचे प्रतिबिंब नसतात. ते त्या चित्रकाराच्या स्वत:च्या संग्रहातलेच रंग असतात.
ते चित्र पुन्हा एकदा वळून पाहण्याइतका वेळ जेव्हा मिळाला, त्या
दिशेला पुन्हा एकवार पाहिलं, तेव्हा त्याच्यातच मन गुंतून गेलं.
ही ‘स्मृतिचित्रमाला’देखील अशाच प्रकारची साहित्याची
साधनसामुग्री आहे. याला जीवनवृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न या
हिशेबानं मोजलं, तर ती चूक होईल.
Added to cart successfully!