Your cart is empty now.
फील्ड मार्शल सॅम माणेकशाभारतीय लष्कराचा मानबिंदूमेजर जन. शुभी सूदअनुवाद :भगवान दातार
चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
*****************************
Added to cart successfully!